‘रायझिंग स्टार करंडक’ (फोटो- सोशल मिडिया)
युवा खेळाडुंसाठी शैक्षणिक पर्वणीच
स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना, स्पर्धेचे संयोजक आणि संचालक सतिश सराफ, अजय सैनीस आणि नितीन सामल यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटची ऐतिहासिक परंपरा असून, जिल्ह्याने अनेक गुणवान खेळाडू महाराष्ट्राला आणि देशाला दिले आहेत. या सर्व खेळाडूंना घडविणाऱ्या वरिष्ठ प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यांचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे. हे सर्व ५० वर्षांवरील खेळाडूंचा खेळ बघणे म्हणजे युवा आणि क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसाठी एक शैक्षणिक पर्वणीच ठरणार आहे.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
सामने साखळी आणि बाद फेरीत
गुलाबी चेंडूवर होणाऱ्या या स्पर्धेत साखळी आणि बाद फेरीचे सामने होणार आहेत. स्पर्धेत एकूण चार निमंत्रित संघ झुंझणार आहे. विश्वजीत नायक यांच्या मालकीचा ‘रायझिंग स्टार रेड’ संघ, प्रवीण गुंदेचा यांच्या मालकीचा ‘रायझिंग स्टार ऑरेंज’ संघ, अच्युत मालकर यांच्या मालकीचा ‘रायझिंग स्टार यलो’ संघ, सनल गोविंद यांच्या मालकीचा ‘रायझिंग स्टार ब्ल्यु’ संघ या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस असणार आहे.
मान्यवर खेळाडू व प्रशिक्षकांचा सहभाग
बंगलोरचे अजय सैनीस आणि विश्वजीत नायक, नितेश वाघेला, वाहिद एस., कोलकाताचे राजीब मुखर्जी, विदर्भचे मकरंद कुलकर्णी, महाराष्ट्राचे प्रवीण गुंदेचा आणि नितीन सामल, जम्मु-काश्मिरचे सतीश सराफ, मध्यप्रदेशचे अच्युत मालाकर आणि चैन्नईचे सनल गोविंद असे नामांकित माजी रणजीपटू आणि जेष्ठ प्रशिक्षक-खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मॅकमन कन्व्हेइंग अँड इंजिनिअरिंग प्रा.लि.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमन जीत पंकज यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीसीसीआयचे सामना रेफ्री श्रीकांत जाधव यांच्या हस्ते होणार आहे.






