फोटो सौजन्य - X
रियान पराग : भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी फक्त 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेमध्ये भारताचा संघ हा युवा खेळाडूसह मैदानात उतरणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका फारच महत्वाची असणार आहे. यावेळी टीम इंडियाची कमान शुभमन गिलच्या हाती आहे, कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताच्या अ संघाने नुकतीच इंग्लड लायन्सविरुद्ध मालिका खेळली या मालिकेच्या दोन्ही सामन्यामध्ये ड्राॅ झाली.
भारतीय संघासाठी इंग्लडचे मोठे आव्हान असणार आहे. याआधी आता क्रिकेट संदर्भात मोठी अपडेटसमोर आली आहे. या मालिकेदरम्यान, आसाम संघ नामिबियाचा दौरा करणार आहे. नामिबिया ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करणार आहे. या मालिकेसाठी रियान परागला आसाम संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. आयपीएल 2025 मध्ये संजू सॅमसनच्या अनुपस्थित राजस्थान राॅयल्सचे कर्णधारपद सांभाळले होते.
10 दिवसात श्रेयस अय्यर दुसऱ्यांदा खेळणार फायनल! संघाला चॅम्पियन बनवणार? वाचा अंतिम सामन्याची माहिती
नामिबिया दौऱ्यासाठी आसाम संघाचा कर्णधार रियान परागला निवडण्यात आले आहे. यापूर्वी आयपीएल २०२५ मध्ये संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसला होता. आता रियानला स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल. नामिबिया क्रिकेट बोर्डाने ही मालिका जाहीर केली आहे. ही मालिका २१ जूनपासून सुरू होईल, तर शेवटचा सामना २९ जून रोजी खेळला जाईल. या मालिकेतील सर्व ५ सामने एफएनबी क्रिकेट ग्राउंडवर खेळले जातील.
ASSAM vs NAMIBIA 📢
– Assam will be playing 5 matches against Namibia from June 21st.
Namibia board has been excellent with getting state teams from India to play series in the last few years. pic.twitter.com/lrCw5fqWf7
— Johns. (@CricCrazyJohns) June 11, 2025
आसामपूर्वी नामिबिया संघ पंजाब आणि कर्नाटक संघांसोबत खेळला आहे. या मालिकेत गेरहार्ड इरास्मस नामिबियाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय संघात जेजे स्मित आणि जान निकोल लॉफ्टी-ईटन सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत, रियान परागचा संघ नामिबियाला अजिबात हलके घेऊ इच्छित नाही.
रियान पराग (कर्णधार), दानिश दास, प्रद्युन सैकिया, राहुल हजारिका, ऋषव दास, सिबशंकर रॉय, सुभम मंडल, आकाश सेनगुप्ता, अमलनज्योती दास, कुणाल सरमा, मृण्मय दत्ता, परवेझ मुसर्रफ, स्वरूप पुरकायस्थ, अभिषेक ठाकुरी (अंकुरवी), ताकेरवी (ताकेत) रुहीनंदन पेगू, सुमित घाडीगावकर, अविनोव चौधरी, भार्गव दत्ता, दर्शन राजबोंगशी, दिपज्योती सैकिया, मुख्तार हुसेन, राहुल सिंग, सिद्धार्थ सरमा.