Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : रोहित विरुद्ध कमिन्स, ऑस्ट्रेलियन कॅप्टनने 6 व्यांदा बाद करून केला विश्वविक्रम

१७ व्या षटकात पॅट कमिन्सने प्रथम भारतीय कर्णधार रोहित शर्माची शिकार केली आणि रोहित शर्माच्या विकेटसह पॅट कमिन्सने विश्वविक्रम रचला. कर्णधार विरुद्ध कर्णधार या लढतीत रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा तो गोलंदाज ठरला

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 30, 2024 | 09:34 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

रोहित शर्मा विरुद्ध पॅट कमिन्स : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एमसीजी कसोटीचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली होती, मात्र पॅट कमिन्सने एका षटकात दोन विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. १७ व्या षटकात पॅट कमिन्सने प्रथम भारतीय कर्णधार रोहित शर्माची शिकार केली आणि नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

रोहित शर्माच्या विकेटसह पॅट कमिन्सने विश्वविक्रम रचला. कर्णधार विरुद्ध कर्णधार या लढतीत रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा तो गोलंदाज ठरला आहे. एमसीजीपूर्वी पॅट कमिन्सने रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा कर्णधारपदावरून बाद केले होते, या सामन्याच्या दोन्ही डावात कमिन्सने रोहितची विकेट घेतली होती. अशा परिस्थितीत रोहितची 6 वेळा शिकार करून पॅट कमिन्स आता कर्णधार विरुद्ध कर्णधार लढतीत नंबर-१ गोलंदाज बनला आहे. याआधी कॅप्टन विरुद्ध कॅप्टन या लढतीत रिची बेनॉडने टेड डेक्सटरला ५ वेळा आणि इम्रान खानने सुनील गावस्करला प्रत्येकी ५ वेळा बाद केले होते.

IND vs AUS : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! मेलबर्नमधील कसोटी क्रिकेटचे सर्वात मोठे टार्गेट किती?

पॅट कमिन्सने रोहित शर्माला ६ वेळा बाद केले*
५ वेळा टेड डेक्सटरला रिची बेनॉडने बाद केले
इम्रान खानने सुनील गावस्करला ५ वेळा बाद केले
रिची बेनॉडने ४ वेळा गुलाबबाई रामचंदला बाद केले
कपिल देवने क्लाइव्ह लॉयडला ४ वेळा बाद केले
रिची बेनॉडने पीटर मेला ४ वेळा बाद केले

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावानंतर १०५ धावांची आघाडी घेतली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यजमान संघाने स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या बळावर ४७४ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात नितीश रेड्डींच्या शतकाच्या जोरावर भारताने ३६९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २३४ धावा केल्या आणि भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य ठेवले.

सध्या भारताच्या संघासाठी यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत फलंदाजी करत आहेत. टीम इंडियाने तीन विकेट्स गमावले आहेत यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे फलंदाज बाद झाले आहेत. यशस्वी जैस्वालने अर्धशतक ठोकले आहे, तर रिषभ पंत सुद्धा टीम इंडियासाठी चांगली फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाला जिंकण्यासाठी ४० ओव्हरमध्ये २३३ धावा करणे गरजेच्या आहेत. भारतचे युवा खेळाडूंनी या मालिकेमध्ये कमाल केली आहे परंतु अनुभवी फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा मागील काही सामान्यांपासून मोठी कामगिरी करू शकले नाही.

Web Title: Rohit sharma vs pat cummins the australian captain took a world record 6th wicket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 08:47 AM

Topics:  

  • India Vs Australia
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 
1

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो
2

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो

India A vs Australia A : वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी कांगारू गोलंदाजांना KL Rahul ने धु धु धुतलं…केला धमाका ठोकलं शतक!
3

India A vs Australia A : वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी कांगारू गोलंदाजांना KL Rahul ने धु धु धुतलं…केला धमाका ठोकलं शतक!

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
4

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.