फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना काल संपला आणि भारताच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये कमालीचा कमबॅक केला आहे. भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीत पराभूत केले आहे. भारताच्या संघाने कॅप्टन रोहित शर्माच्या अनुपस्थित जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, पितृत्व रजा संपल्यानंतर पर्थला पोहोचला आहे, त्यानंतर लगेचच तो सरावासाठी ताबडतोब नेटवर पोहोचला, तर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. काही दिवसांपूर्वी मुलाच्या जन्मानंतर, रोहित शर्मा रविवारी संध्याकाळी पर्थला पोहोचला आणि ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताच्या सर्वात मोठ्या कसोटी विजयाचा साक्षीदार होण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होता.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
रोहित शर्मा सोमवारी दुपारच्या जेवणाच्या सत्रात नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला जेथे त्याने गुलाबी चेंडूने राखीव वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, यश दयाल आणि मुकेश कुमार यांचा सामना केला. ६ डिसेंबरपासून सुरू होणारी दुसरी कसोटी दिवस-रात्र असेल आणि गुलाबी चेंडूने खेळली जाईल. अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजानेही गोलंदाजी केली आणि सत्रादरम्यान त्याने नुवान सेनाविरत्नेच्या ‘थ्रो डाउन’वर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.
पर्थ कसोटीत आठ विकेट्स घेतल्याबद्दल सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झालेल्या जसप्रीत बुमराहने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माचे स्वागत केले. जसप्रीत बुमराह म्हणाला, ‘मी त्यांना शक्य होईल त्या मार्गाने मदत करण्यास उत्सुक आहे.’ रोहित शर्मा लयीत येण्याचा प्रयत्न करत आहे आणि नेट सत्रादरम्यान त्याने काही शानदार शॉट्स खेळले पण काही प्रसंगी तो चुकला.
30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यासाठी भारतीय संघ बुधवारी कॅनबेरा येथे जाणार आहे. या सराव सामन्याला प्रथम श्रेणीचा दर्जा नाही. तथापि, हा सामना महत्त्वाचा असेल, कारण हा गुलाबी चेंडूचा दिवस-रात्र सामना आहे जो ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी महत्त्वाचा असेल. रोहित कॅनबेरा येथील या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे, कारण ॲडलेडमधील गुलाबी कूकाबुरा चेंडू फलंदाजांसाठी वेगळ्या प्रकारचे आव्हान प्रस्तुत करतो, विशेषत: संध्याकाळच्या दिव्यांच्या वेळी जेव्हा चेंडू नेहमीपेक्षा जास्त फिरतो.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा संघामध्ये परतल्यानंतर दुसऱ्या कसोटीमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण रोहित शर्माच्या जागेवर यावेळी केएल राहुल सलामीवीर फलंदाज म्हणून फलंदाजी केली. यावेळी राहुलने संघासाठी कमालीची ७७ धावांची खेळी खेळली. त्यामुळे आता रोहित शर्मा संघामध्ये आल्यानंतर केएल राहुलला संघामध्ये स्थान मिळणार की नाही हे पाहणं मनोरंजक ठरेल.