फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore match report : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना पार पडला. यामध्ये पुन्हा एकदा फिल्ल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या जोडीने कमाल केली आणि संघाला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंन्जर्स बंगळुरूच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ९ विकेट्सने पराभूत केले आहे. राजस्थानच्या संघासाठी यशस्वी जैस्वालने कमालीची खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. बंगळुरूसाठी विराट कोहलीने आणखी एकदा कमाल खेळ दाखवला. आजच्या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यावर एकदा नजर टाका.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर फिल्ल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. बंगळुरूच्या संघाने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट गमावला नाही. बंगळुरूच्या संघाने पहिला विकेट ८.४ ओव्हरमध्ये गमावला. यावेळी फिल्ल सॉल्टने त्याची विकेट गमावली. त्याने या सामन्यात संघासाठी ३३ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ षटकार आणि ५ चौकार मारले. विराट कोहलीने आणखी एकदा त्यांच्या फलंदाजीने चाहत्यांना आनंद दिला. विराट कोहलीने संघासाठी धुव्वादार खेळी खेळली आणि अर्धशतक झळकावले.
Another away game, another strong show from RCB in IPL 2025! 👏💚#IPL2025 #RRvRCB #Sportskeeda pic.twitter.com/0lMTaG5L1Q
— Sportskeeda (@Sportskeeda) April 13, 2025
विराट कोहलीने या सामन्यात ४५ चेंडूमध्ये ६२ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार आणि ४ चौकार मारले. तर विराट कोहलीला आजच्या सामन्यात देवदत्त पडिकलने साथ दिली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने फक्त १ विकेट गमावला. देवदत्त पडिकलने संघासाठी २८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या, यामध्ये त्याने १ षटकार आणि ४ चौकार मारले. राजस्थान रॉयल्ससाठी कुमार कार्तिकेयाने १ विकेट घेतला त्याव्यतिरिक्त एकही खेळाडू विकेट घेऊ शकला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजीचे सांगायचे झाले तर भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचे बोलायचे झाले तर फलंदाजांनी आज खूप संथ सुरुवात केली त्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरले. यशस्वी जैस्वालने संघासाठी ४७ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या, यामध्ये त्याने १० चौकार आणि २ षटकार ठोकले. संजू सॅमसन या सामन्यात मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला, त्याने संघासाठी १५ धावा केल्या आणि कृणाल पंड्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. रियान परागने ३० धावांची खेळी खेळली तर ध्रुव जुरेल ३५ धावा करून नाबाद राहिला.