Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री 

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील ३४ व्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने युएई ६ विकेट्सने पराभूत केले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिका संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 18, 2026 | 04:18 PM
RSA vs UAE, T20 World Cup: South Africa beat UAE by 6 wickets! Enters Super 8s in spirit

RSA vs UAE, T20 World Cup: South Africa beat UAE by 6 wickets! Enters Super 8s in spirit

Follow Us
Close
Follow Us:

RSA vs UAE, T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील  ३४ व्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने आपला प्रभावी फॉर्म कायम राखत युएई ६ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने यूएईने दिलेले १२३ धावांचे लक्ष्य १३.२ षटकांत ४ गडी गमावत गाठले.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, युएई संघ २० षटकांत ६ गडी गमावत फक्त १२२ धावापर्यंत पोहचू शकला. आर्यंश शर्मा आणि मोहम्मद वसीम यांनी पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचली. आर्यंश शर्मा १३ धावा काढून माघारी गेला. २२ धावा करून मोहम्मद वसीमही पव्हेलियनमध्ये परतला. अलिशान शराफूने येथेही एक बाजू सांभाळली.

हेही वाचा : IND vs NED, T20 World Cup: आज नेदरलँडपुढे बलाढ्य भारताचे आव्हान! अहमदाबादमध्ये सूर्या आर्मी गाठणार 300 धावांचा पल्ला?

कॉर्बिन बॉशची भेदक गोलंदाजी

आलिशान शराफूने ३८ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला. मोहम्मद अरफानने शेवटी येऊन ११ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी यूएईच्या फलंदाजांना जलद धावा करण्यापासून रोखले. यूएईचा संघ फक्त १२२ धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने ४ षटकात फक्त १२ धावा देत सर्वाधिक ३ बळी टिपले.  अँरिच नॉर्टजेने ४ षटकात २८ धावा देत २ बळी घेतले.  तर जॉर्ज लिंडेने १ बळी घेतला.

South Africa’s perfect run at #T20WorldCup 2026 remains intact following their win against UAE 👌 Watch highlights from every match of the ICC Men’s T20 World Cup 2026 on ICC website and app 🎥https://t.co/FlkqOYwrfp — ICC (@ICC) February 18, 2026

दक्षिण आफ्रिकेची शानदार सुरुवात

१२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या दक्षिण आफ्रिका संघाने शानदार सुरुवात केली. कर्णधार एडेन मार्कराम आणि क्विंटन डी कॉक या सलामीवीरांनी  ३ षटकात ३२ धावा काढत जलद सुरुवात केली. मार्कराम ११ चेंडूत २८ धावा काढून बाद झाला, या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावले.तर ५६ धावांवर डी कॉक बाद झाला. डी कॉक १६ चेंडूत १४ धावा करून बाद झाला.

हेही वाचा : अरेरे पाकवर काय ही वेळ! ‘आम्ही भांडीही धुतली…’ कर्णधाराने हॉटेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची कहाणी उलगडली

दक्षिण आफ्रिकेचा सुपर ८ मध्ये प्रवेश

दासखीन आफ्रिकेच्या रायन रिकेलटनने १६ चेंडूत ३० धावा केल्या, ज्यामध्ये त्याने २ षटकार आणि ३ चौकार लगावले. तर  डेवाल्ड ब्रुईसने २५ चेंडूत ३६ धावा केल्या, ज्यामध्ये ३ षटकार आणि १ चौकारांचा समावेश होता. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३० चेंडूत ४९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. स्टब्स ७ चेंडूत ६ धावा काढून नाबाद राहिला आणि जेसन स्मिथ ५ चेंडूत ३ धावा काढून नाबाद राहिला. या दोघांनी  दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेने  १३.२ षटकांत ४ गडी गमावून १२३ धावा करत ६ गडी राखून सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने(टी-२० विश्वचषक २०२६) सुपर ८ मध्ये एंट्री केली. कॉर्बिन बॉश सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

Web Title: Rsa vs uae t20 world cup south africa defeats united arab emirates by 6 wickets to enter super 8

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

PAK vs NAM, T20 World Cup : पाकसाठी अस्तित्वाची लढाई; नामिबियाविरुद्ध TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 
1

PAK vs NAM, T20 World Cup : पाकसाठी अस्तित्वाची लढाई; नामिबियाविरुद्ध TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना
2

मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, स्टार ऑलराउंडरने सांगितली करिअरच्या टर्निंग पॉइंटची स्टोरी!
3

‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, स्टार ऑलराउंडरने सांगितली करिअरच्या टर्निंग पॉइंटची स्टोरी!

PAK vs NAM: पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’, ही एक चूक अन् पाक T20 World Cup 2026 मधून बाद!
4

PAK vs NAM: पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’, ही एक चूक अन् पाक T20 World Cup 2026 मधून बाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.