
SA vs PAK: Big blow to South Africa! 'This' player, the backbone of the team, out of the Test series against Pakistan
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून त्याला बाहेर पडावे लागले आहे. अलिकडच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये बावुमाला दुखापत झाली होती आणि तो आता पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. बावुमा सहा ते आठ आठवड्यांत बरा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका संघ आशा धरून बसला आहे की, तो भारत दौऱ्यापूर्वी तंदुरुस्त होईल.
पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघ हा जवळपास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या संघासारखाच आहे. देवाल्ड ब्रेव्हिसला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे. ब्रेव्हिसने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. ऑफ-स्पिनर सायमन हार्मर, प्रेनेलन सुब्रैयन आणि झुबैर हमजा यांना देखील संघात संधी मिळाली आहे.
हार्मरने मार्च २०२३ पासून एक देखील कसोटी सामना खेळलेला नाही, तर सुब्रैयनला अलीकडेच आयसीसीकडून संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनसाठी मंजुरी देण्यात आली आहे. तर केशव महाराज दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील होणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे केशव महाराज पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असणार नाही.
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दुर्दैवाने, टेम्बा बावुमा पायाच्या दुखापतीमुळे पुढील सहा ते आठ आठवडे मैदानावर खेळू शकणार नाहीत. नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यासाठी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त आणि सज्ज होण्याची सर्वोत्तम संधी देण्यावर आमचे लक्ष असणार आहे. टेम्बा उपलब्ध नसल्याने आम्ही निराश झालो आहोत. तो केवळ कसोटी संघाचा प्रमुख नेता नाही तर एक उत्कृष्ट फलंदाजही आहे. त्याच्याशिवाय, संघाला मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याची उणीव नक्कीच भासणार आहे.
एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, सायमन हार्मर, मार्को जॅनसेन, केशव महाराज (केवळ दुसरी कसोटी), विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन सुब्बल, प्रेनेल स्टुब्स, प्रिन्सेन के.