अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : काल म्हणजेच रविवारी २१ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ (Asia cup 2025) मधील सुपर ४ फेरीतील सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय सलामीवीरांनी स्फोटक कामगिरी करत भारताचा विजय अधिक सोपा केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने ४७ धावा केल्या. या दरम्यान भारताचा अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक खेळीने सर्वांना प्रभावित केले. यासह त्याने अनेक विक्रम देखील रचले. तर एका विक्रमाने मात्र त्याला हुलकावणी दिली. त्याबाबत आपण जाणून घेऊया.
अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करत आहे. त्याने चार सामन्यात १७३ धावा केल्या असून तो धावांच्याबाबत आघाडीवर असणारा फलंदाज आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये अभिषेकची फलंदाजी थोडीशी ट्रेलरसारखी राहिली होती, परंतु पाकिस्तानविरुद्ध ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावा करून, त्याने आपल्या क्षमतेचा पूर्ण चित्रपटच दाखवला. त्याने गोलंदाजांना चिरडून टाकेल आहे. या डावात अभिषेकची बॅट तळपली आणि तिने अनेक विक्रम रचले आहेत, तरी एक कामगिरी करण्यावाचून तो राहिला.
हेही वाचा : Asia cup 2025 : Abhishek Sharma पाकिस्तानवर कडाडला! आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर टोलवला ऐतिहासिक षटकार
अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीच्या कामगिरीमध्ये त्याने फक्त २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे, ज्यामुळे तो दोन्ही देशांदरम्यान टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. जर त्याने २२ चेंडूत, दोन चेंडू आधी अर्धशतक पूर्ण केले असते, तर मात्र त्याने २०१२ मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्ध या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीजचा विक्रम मोडीत काढला असता. त्याचा विक्रम अबाधित राहिल्याने हाफीजने निःसंशयपणे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.