
फोटो सौजन्य : X
सचिन तेंडुलकर व्हिडीओ : बाॅलीवुड स्टार अमीर खान यांचा नवा सिनेमा सितारे जमीन पर सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याने अनेक ठिकाणी या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले आहे. सध्या या चित्रपट चर्चेत असण्याचे कारण म्हणजेच या चित्रपटामधील कलाकार. चित्रपटाच्या प्रमोशनामुळे देखील सध्या अमीर खान त्याच्या घरी अनेक पार्टिचे देखील आयोजन करत आहे. कालदेखील अमीर खानने घरी पार्टीचे आयोजन केले होते, या पार्टीला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता.
सचिन तेंडुलकर जेव्हा अमीर खान यांच्या घरी एंन्ट्री करतो त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा सचिन येतो आणि अमीर खान हा त्याच्या स्वागतासाठी दरवाज्यावर जातो सचिन आणि त्याची पत्नी अंजली सोबत हात मिळवतो. त्यानंतर जेव्हा चित्रपटामधील दिव्यांग कलाकार हे सचिन तेंडुलकर यांना पाहतात तेव्हा त्याचा आनंद हा वेगळ्याच उंचावर असतो. यावेळी तेथे असलेले सर्वच मुले सचिन… सचिनचे नारे लावतात.
सचिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घरात पाऊल ठेवताच कुजबुज मोठ्याने जयघोषात रूपांतरित झाली आणि वातावरण बदलले. ‘सचिन, सचिन’ या प्रसिद्ध आणि रोमांचक जयघोषाने खोली दुमदुमून गेली, जे एकेकाळी जगभरातील स्टेडियममध्ये प्रतिध्वनीत होते आणि आता बॉलीवूडच्या हृदयात प्रतिध्वनीत आहे.
Sachin Tendulkar aura is at a different level.. None can touch the level of popularity more than Sachin Tendulkar. God of cricket for a reason 🙏 pic.twitter.com/tEaTMaOyfb — CrickeTendulkar (@CrickeTendulkar) June 7, 2025
सितारे जमीन पर हा सिनेमा 20 जूनला चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी अमीर खानचे चाहते फारच उत्सुक आहेत. अमीर खान बऱ्याच वेळानंतर पुन्हा मोठ्या परद्यावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी नावाच्या नवीन ट्रॉफीसाठी स्पर्धा खेळवला जाणार आहे. ही ट्रॉफी दोन महान दिग्गजांना सन्मानित करते. बीबीसीच्या वृत्तानुसार, २० जून रोजी हेडिंग्ले येथे होणाऱ्या मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी नवीन ट्रॉफीचे अनावरण केले जाणार आहे.