
भारताचा संघ सध्या इंग्लडविरुद्ध मालिका खेळत आहे, भारताचा संघ ही मालिका ड्राॅ करण्यामध्ये यश मिळवणार की नाही हे तर वेळ आल्यावरच समजणार आहे त्याआधी आता भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याने त्याच्या कामगिरीने तर जगाला चकीत केले आहेच. त्याने त्याच्या नावावर देखील अनेक विक्रम देखील केले आहेत. पण त्याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर सुद्धा क्रिकेट खेळत आहे पण त्याला संघामध्ये खेळण्याची पार काही संधी मिळाली नाही.
आयपीएलमध्ये अर्जुन तेंडूलकर याला मुंबईच्या संघामध्ये संधी मिळते पण त्याला फार कमी वेळा प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर ही तिच्या फिल्डमध्ये चमतकार करत आहे. दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाची नवीन पर्यटन ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. तिने तिच्या सुंदरतेमुळे आणि शैलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे.
IND vs ENG 5th Test : शुभमन गिलने आकाशदीपला फटकारले की फक्त प्रश्न विचारला? नक्की प्रकरण काय?
खरं तर, ऑस्ट्रेलियन सरकार एक नवीन पर्यटन कंपनी सुरू करत आहे. यासाठी त्यांनी भारतासह अनेक प्रसिद्ध लोकांना समाविष्ट केले आहे. या १३० दशलक्ष डॉलर्सच्या मोहिमेचे नाव कम अँड से जी डे आहे. चला या मोहिमेबद्दल जाणून घेऊया
या मोहिमेचा उद्देश लोकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास प्रोत्साहित करणे आहे. लोक ऑस्ट्रेलियाच्या सहलींचे नियोजन आणि बुकिंग करू शकतील. ही मोहीम ७ ऑगस्ट रोजी चीनमध्ये सुरू होईल आणि वर्षाच्या अखेरीस अनेक बाजारपेठांमध्ये विस्तारित केली जाईल. अमेरिका, चीन आणि जपानमधील सेलिब्रिटींना या मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील केले जाईल.
या जाहिरातीत भारतातील सारा तेंडुलकर, अमेरिकेतील रुबी डी रू, स्टीव्ह इर्विन यांचा मुलगा रॉबर्ट इर्विन यांचाही समावेश आहे. चीनमधील कलाकार योश यू, जपानमधील कॉमेडी स्टार अबेरू-कुन आणि ऑस्ट्रेलियन अभिनेता थॉमस वेदरॉल यांचाही या जाहिरातीत समावेश असेल.
गेल्या काही वर्षांत सारा तेंडुलकरने फॅशन आणि मॉडेलिंगच्या जगात हळूहळू प्रवेश केला आहे. तथापि, त्यानंतरही तिचा प्रभाव वेगाने वाढतच राहिला आहे. ही नवीन मोहीम एका आघाडीच्या ऑस्ट्रेलियन ब्रँडसोबत आहे, जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करणार आहे. तिच्या स्टाईल, व्यक्तिमत्त्व आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे या ब्रँडने साराला तिच्या मोहिमेचा चेहरा बनवले आहे. पण मनोरंजक गोष्ट अशी आहे की साराने अद्याप बॉलिवूड किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेला नाही, तरीही तिला हे यश मिळाले आहे.