Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Sachin Tendulkar : २४ वर्षांची लखलखीत क्रिकेट कारकिर्द, निवृत्तीच्या क्षणाने क्रीडा जगताला रडवलं..  

आज सचिन तेंडुलकर आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला क्रिकेटच्या देव म्हणून ओळखले जाते. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. त्याच्या २४ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 08:07 AM
Happy Birthday Sachin Tendulkar: 24 years of dazzling cricket career, the moment of retirement made the sports world cry..

Happy Birthday Sachin Tendulkar: 24 years of dazzling cricket career, the moment of retirement made the sports world cry..

Follow Us
Close
Follow Us:

Happy Birthday Sachin Tendulkar : आज क्रिकेटच्या देव म्हणजेच सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे.  सचिन तेंडुलकर आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. सचिन तेंडुलकरने २४ वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना आपल्यासमोर २२ यार्डच्या खेळपट्टीवर गुडघे टेकण्यास मजबूर केले. त्याने अनेक विक्रम रचत, विक्रमांचाच एक विक्रम रचला आहे. सचिन तेंडुलकरने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच १८ डिसेंबर १९८९ रोजी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणापासून ते कारकिर्दीच्या शेवटापर्यंत त्याने अनेक विक्रम मोडले आणि असे अनेक विक्रम देखील केले. जाणून घेऊया क्रिकेटच्या देवांबद्दल अधिक माहिती..

सचिन तेंडुलकर एका महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्माला आला आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर यांनी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोठी भूमिका वठवली आहे. त्याच्या भावाने सचिनची खेळातील क्षमता ओळखून त्याला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे घेऊन गेला. त्यानंतर सचिनने रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घ्यायाल सुरवात केली.

हेही वाचा : RR vs RCB : राजस्थान क्रम सुधारण्यास उत्सुक, तर घरच्या मैदानावर बंगळुरूला गढ राखण्याचे आव्हान! आज RR vs RCB आमनेसामने..

कारकिर्दीची सुरुवात..

सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकिर्द पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरू झाली. त्यावेळी त्याचे वय केवळ १६ वर्ष होते. मैदानावर पाऊल ठेवताच तो सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेट खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्याचे पदार्पण त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता, परंतु पदर्पणात तो फारसे काही करू शकला नाही. मात्र, त्यान एक गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात आणून दिली ती म्हणजे तो मोठ्या गोलंदाजांचा सहज सामना करण्याची ताकद ठेवतो.

आणि सचिनचे पहिले शतक आले..

सचिन तेंडुलकरने १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. या शतकाच्या मदतीने भारताने इंग्लंडविरुद्ध सामना अनिर्णित राखला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांचा विक्रम

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल ४९ शतके झळकावली  आहेत. एकेकाळी असे वाटत होते की हा विक्रम क्वचितच कुणाला मोडता येईल, परंतु विराट कोहलीने हा विक्रम मोडीत काढत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ शतके केली आहेत. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक १९९४ मध्ये कोलंबो येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले होते.

एकदिवसीय कारकीर्द आहे..

पहिल्या शतकापासून सचिन तेंडुलकरने मागे वळून पाहिले नाही. त्याने मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा देखील विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर नोंदवाला गेला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू ठरला होता. २०११ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्या अनेक खेळींनी भारताला विजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सचिनने ४६३ सामन्यांच्या ४५२ डावांमध्ये ४४.८३ च्या सरासरीने १८२४६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४९ शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०० राहिली आहे.

हेही वाचा : SRH Vs MI: ‘हीटमॅन’च्या दमदार खेळीने मुंबई पलटणचा ‘एसआरएच’वर दणदणीत विजय; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

 कसोटी क्रिकेटमधील स्थान सर्वोत्तम

सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेट गाजवळिया आहे. त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. त्याने २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम  केला आहे. या दरम्यान त्याने ५१ शतके देखील  झळकावली आहेत. जो स्वतःच एक जागतिक विक्रम ठरला आहे. सचिन तेंडुलकरने कसोटीत १५,९२१ धावा केल्या आहेत. त्याने १९९९ मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

..आणि  एका युगाचा अंत

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या दिवशी एका युगाचा अंत झाला होता. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा समना खेळून क्रिकेटला निरोप दिला होता. सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सामन्यात त्याने ७४ धावांच्या खेळीने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला होता. सचिनची निवृत्ती हा संपूर्ण देशासाठी भावनिक क्षण होता.

भारताचा सर्वोत्तम नागरी पुरस्काराने सन्मानित

सचिन तेंडुलकरला भारताचा सर्वोत्तम नागरी पुरस्कार देण्यात आला आहे. २०१४ मध्ये सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात आला होता. हा सन्मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला होता. यापूर्वी त्यांना १९९४ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९७ मध्ये त्यांना राजीव गांधी खेलरत्न, १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Sachin tendulkar who has had a glittering cricket career spanning 24 years celebrates his birthday today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 08:07 AM

Topics:  

  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
1

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…
2

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
3

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

‘मी  बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम
4

‘मी बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.