मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय (फोटो- ट्विटर)
Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad: आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकी खेळीने मुंबईने सलग 4 था विजय मिळवला आहे. रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबई इन्डियन्सचा संघ आता थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
𝗞𝗛𝗔𝗗𝗔 𝗛𝗨 𝗔𝗔𝗝 𝗕𝗛𝗜 𝗪𝗔𝗛𝗜… lekin back to back 𝔽𝕀𝔽𝕋𝕀𝔼𝕊 ke saath! 😉#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #SRHvMI pic.twitter.com/FD9tGwWJmP
— Mumbai Indians (@mipaltan) April 23, 2025
हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुंबईने भेदक गोलंदाजी करून हैदराबादच्या संघाला 143 धावांवर रोखले. मुंबई इंडियन्सने हे आव्हान चार गडी गमावून हा सामना जिंकला आहे. 16 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला आहे. रोहित शर्मा आणि बोल्ट हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
दीपक चाहरने गोलंदाजीला सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी यांनी आपल्या विकेट्स गमावल्या आहेत. हैदराबाद आणि मुंबई यांच्यामध्ये आतापर्यत २४ सामने झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यत १४ सामने हैदराबादविरुद्ध जिंकले आहेत. तर हैदराबादच्या संघाने या मुंबईविरुद्ध १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध १० सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आजच्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट/मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, इशान मलिंगा
हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.