Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण
जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कार्तिक गुरुमूर्ती आणि करण अरोरा यांनी सह-स्थापना केलेल्या SRT10 Athleisure Pvt. Ltd. अंतर्गत कार्यरत TEN x YOU या स्पोर्ट्सवेअर ब्रँडने आज आपल्या अधिकृत लाँचची घोषणा केली. सचिन तेंडुलकर यांच्या २४ वर्षांच्या मैदानावरील अनुभवावर आधारित हा ब्रँड भारतीय खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
TEN x YOU ची उत्पादने उच्च दर्जाच्या ॲथलीझर गिअरच्या श्रेणीत मोडतात, जे विचारपूर्वक डिझाइन, जागतिक दर्जाची स्टॅंडर्ड आणि शरीराच्या रचनेसाठी विशेषतः विकसित आराम प्रदान करतात.
या स्पोर्ट्सवेअर ब्रँडच्या लाँच प्रसंगी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला, “गल्लीतून ते स्टेडियमपर्यंत खेळ हा आनंद आणि प्रेरणेचा स्रोत आहे. माझे स्वप्न आहे की भारत खेळ पाहणाऱ्या देशातून खेळ खेळणारा देश बनावा. TEN x YOU द्वारे आम्ही खेळाडूंसाठी तयार करत असलेले प्रत्येक उत्पादन माझ्या बॅट आणि किटमधील तितक्याच बारकाईने तपासलेले आहे. खेळ तुम्हाला जगाच्या शिखरावर असल्याची भावना देतो — म्हणून फक्त सुरुवात करा आणि कधीही खेळणे थांबवू नका!”
TEN x YOU चे सह-संस्थापक आणि CEO कार्तिक गुरुमूर्ती म्हणाले, “TEN x YOU हा अनुभव आणि अंतर्दृष्टी यांचा संगम आहे. सचिन तेंडुलकरच्या प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेली माहिती आम्ही अशा उत्पादनांत रूपांतरित करत आहोत जी प्रत्येक भारतीयासाठी योग्य ठरतील. भारतीय पाय रुंद आहेत, हवामान वेगळं आहे आणि आमच्या प्रत्येक डिझाइनमध्ये हे घटक विचारात घेतले गेले आहेत.”
ब्रँडची श्रेणी केवळ क्रिकेट गिअरपुरती मर्यादित नसून, दैनंदिन वापरासाठीचे लाइफस्टाइल फुटवेअर, ॲपरेल आणि ट्रेनिंग कलेक्शनही समाविष्ट करते. प्रत्येक उत्पादन वास्तविक परिस्थितींमध्ये टेस्टिंग करून परिष्कृत केले जाते, जेणेकरून टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि आराम यांचा सर्वोच्च दर्जा सुनिश्चित करता येईल.
TEN x YOU हा बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेला स्पोर्ट्स आणि ॲथलीझर ब्रँड आहे, ज्याची सह-स्थापना सचिन तेंडुलकर, कार्तिक गुरुमूर्ती आणि करण अरोरा यांनी केली आहे. ब्रँडला Peak XV (SurgeXI Co-Hort) आणि Whiteboard Capital यांचा पाठिंबा आहे.
हा ब्रँड “खेळाला दैनंदिन जीवनात परत आणणे” या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. TEN x YOU भारतीय शरीररचनेसाठी डिझाइन केलेले शूज, पोशाख आणि ॲक्सेसरीज तयार करतो, जे आराम, टिकाऊपणा आणि बहुपयोगीपणाचे कॉम्बिनेशन आहेत. अमेरिका, जर्मनी, तैवान, श्रीलंका, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील तज्ञांसह विकसित केलेले हे उत्पादन जागतिक दर्जाच्या कारागिरीचे प्रतीक आहे.