फोटो सौजन्य – X
भारतामध्ये जर एखाद्या खेळाडूला क्रिकेट खेळाडू व्हायच्या असेल तर त्या खेळाडूला त्याची चप्पल झिजेपर्यंत मेहनत घ्यावी लागते. भारताचे असेच अनेक खेळाडू आहेत ते फक्त डोमेस्टिक क्रिकेट ठेवून निवृत्ती घेतात. टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये फार कमी खेळाडूंना संधी मिळते. भारतामध्ये प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये लहान मुलांना किंवा क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडुला क्रिकेटर व्हायचे असते. मागील अनेक वर्षांपासून महिला क्रिकेट देखील प्रगती करत आहे.
मागील तीन वर्षे झाले ज्याप्रकारे इंडियन प्रीमियर लीग पुरुष खेळतात त्याचप्रमाणे महिला प्रीमियर लीग सुद्धा सुरू करायला लागले आहे. यामध्ये अनेक देश-विदेशातील महिला खेळाडू या लीगमध्ये सामील होतात. आयपीएल त्याचबरोबर डब्ल्यूपीएल दोन लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय संघामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिली जाते. त्याचबरोबर परदेशामध्ये होणाऱ्या लीगमध्ये देखील अनेक खेळाडू सामील होतात.
भारतीय महिला क्रिकेटपटू सलोनी डांगोरची कहाणी यापेक्षा थोडी वेगळी आहे. २०१७ मध्ये तिच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारी सलोनी आजपर्यंत फक्त देशांतर्गत क्रिकेट खेळली आहे. टीम इंडियासाठी खेळणे तर दूरची गोष्ट आहे, तिला आजपर्यंत महिला प्रीमियर लीगमध्ये खेळता आलेले नाही, परंतु आता ती थेट कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसेल. सलोनीची कहाणी इतर सर्व क्रिकेटपटूंपेक्षा वेगळी आहे कारण तिला आधी क्रिकेटर व्हायचे नव्हते. सलोनी डांगोरेला लहानपणापासूनच अॅथलेटिक्समध्ये आवड होती आणि म्हणूनच तिची फिटनेस अद्भुत होती.
IND vs ENG: ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral
तिने राष्ट्रीय स्तरावर लांब उडी आणि १००, २०० मीटर शर्यतींमध्ये भाग घेतला आहे. आज तिच्या लेग स्पिनने फलंदाजांना त्रास देणाऱ्या सलोनीला २०१५ पर्यंत लेग स्पिन म्हणजे काय हे देखील माहित नव्हते. वयाच्या १७ व्या वर्षी, कोणाच्या तरी सल्ल्याने, तिने अॅथलेटिक्स सोडून क्रिकेटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सलोनीने २ राज्यांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. २०१७ मध्ये तिने मध्य प्रदेशकडून खेळून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली पण नंतर ती छत्तीसगडकडून खेळू लागली.
तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत तिला वेगवान गोलंदाजी करायची होती पण प्रशिक्षकांच्या सल्ल्याने ती लेग स्पिन गोलंदाज बनली. शॉन वॉर्नचा व्हिडिओ पाहून तिने लेग स्पिन गोलंदाजी करायचा प्रयत्न केला आणि ती शिकली. फिरकी गोलंदाजीसोबतच तिला खालच्या फळीत फलंदाजी करून योगदान कसे द्यायचे हे देखील माहित आहे.