Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी 

आज टी२० विश्वचषकामध्ये कोलकाता ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या स्कॉटलंड आणि  इटली यांच्यातील सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभव केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 09, 2026 | 04:40 PM
SCO vs ITA, T20 World Cup 2026: Scotland thrashed Italy by 73 runs! An all-round performance from Michael Leask.

SCO vs ITA, T20 World Cup 2026: Scotland thrashed Italy by 73 runs! An all-round performance from Michael Leask.

Follow Us
Close
Follow Us:

SCO vs ITA,T20 World Cup 2026 : आज टी२० विश्वचषकामध्ये कोलकाता ईडन गार्डन्सवर स्कॉटलंड आणि  इटली यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ४ गडी गमावून २०७ धावा केल्या. तर प्रतिउत्तरात इटलीचा संघ १६.४ षटकांत केवळ १३४ धावा करू शकला. परिणामी स्कॉटलंडने टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपला पहिला विजय नोंदवला. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : ITA vs SCO : T20 World Cup 2026 मध्ये पहिल्यांदाच झाल्या 200 धावा पार! इटलीचा कर्णधार गंभीर जखमी, वाचा सामन्याचा अहवाल

इटलीने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ४ बाद २०७ धावा केल्या, जॉर्ज मुन्से यांनी ५४ चेंडूत ८४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच,  ब्रेंडन मॅकमुलन यांनी १८ चेंडूत जलद नाबाद ४१ धावा करून संघाला २०७ धावांपर्यंत पोहोचवले. इटलीकडून अली हसन, थॉमस ड्रेका, ग्रँट स्टीवर्ट आणि जेजे स्मट्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Scotland open their #T20WorldCup account with a comprehensive victory in Kolkata 👏 📝: https://t.co/01Ywp9sRp6 pic.twitter.com/qZtIZsWFFw — ICC (@ICC) February 9, 2026

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलल्या इटली संघाची सुरुवात चांगली झाली नाही. स्कोअर बोर्डवर शून्य धावा असतानाच संघाला पहिल धक्का बसला. जस्टिन मोस्का भोपळा न फोडता बाद झाला. बेन मॅनेंटी आणि हॅरी मॅनेंटी या दोघांनीच चांगली फलंदाजी केली. परंतु, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.हॅरी मॅनेंटी २५ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला तर बेन मॅनेंटीने ३१ चेंडूत ५२ धावा काढल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही. परिणामी संघ १६.४ षटकांत केवळ १३४ धावा करू शकला. मायकेल लास्कने उत्कृष्ट कामगिरी करत स्कॉटलंडच्या डावाचे नेतृत्व केले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. टी२० विश्वचषकात असोसिएट संघाकडून २०० पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.  स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर मार्क वॅट २ , ब्रॅड करी, ब्रॅड व्हील आणि ऑलिव्हर डेव्हिडसन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

टी२० विश्वचषकात असोसिएट संघाने केलेली सर्वाधिक धावसंख्या

  1. २०७/४ – एससीओ विरुद्ध आयटीए, कोलकाता, २०२६ (पहिला डाव)*
  2. १९७/३ – यूएसए विरुद्ध सीएएन, डलास, २०२४ (दुसरा डाव)
  3. १९४/५ – सीएएन विरुद्ध यूएसए, डलास, २०२४ (पहिला डाव)
  4. १९३/४ – एनईडी विरुद्ध आयआरई, सिल्हेट, २०१४ (दुसरा डाव)
  5. १८९/४ – आयआरई विरुद्ध एनईडी, सिल्हेट, २०१४ (पहिला डाव)
हेही वाचा : IND VS PAK : “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

स्कॉटलंड खेळणारा इलेव्हन : जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रेंडन मॅकमुलेन रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), मार्क वॅट, मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील, ब्रॅड करी

इटली प्लेइंग इलेव्हन: जस्टिन मोस्का, अँथनी मोस्का, जेजे स्मट्स, वेन मॅडसेन (कर्णधार), हॅरी मॅनेंटी, बेन मॅनेंटी, जियान मीड (यष्टीरक्षक), ग्रँट स्टीवर्ट, कृष्ण कालुगामेगे, अली हसन, थॉमस ड्रेका

 

 

Web Title: Sco vs ita in the t20 world cup scotland defeated italy by 73 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया
1

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 
2

ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक
3

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक

ITA vs SCO : T20 World Cup 2026 मध्ये पहिल्यांदाच झाल्या 200 धावा पार! इटलीचा कर्णधार गंभीर जखमी, वाचा सामन्याचा अहवाल
4

ITA vs SCO : T20 World Cup 2026 मध्ये पहिल्यांदाच झाल्या 200 धावा पार! इटलीचा कर्णधार गंभीर जखमी, वाचा सामन्याचा अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.