पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया(फोटो-सोशल मीडिया)
The ICC gave a strong response to Pakistan’s demands : टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी सामना होणार होता. परंतु, या सामान्याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. पाकिस्तानकडून बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताशी खेळण्यास नकार देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी लाहोरमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसी-पीसीबी-बीसीबीची उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये झालेली ही बैठक पाच तासांपेक्षा जास्त काळ चालल्याचे वृत्त आहे. यावेळी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी, आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड अध्यक्ष अमिनुल इस्लाम उपस्थित होते. पाकिस्तानने आयसीसीकडे न पूर्ण होणाऱ्या मागण्या केल्या आहेत. ज्यावर आता आयसीसीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी
पीसीबीने पहिली मागणी केली ती म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये वाढत्या योगदानामुळे बांगलादेश आयसीसीकडून मोठा आर्थिक वाटा इच्छित आहे. बोर्डाकडून असा युक्तिवाद करण्यात आला आहे, की पायाभूत सुविधा, प्रतिभा विकास आणि राष्ट्रीय संघाच्या स्पर्धात्मक दर्जा सुधारण्यासाठी अधिक निधीची गरज आहे.
दुसरी मागणी करताना म्हटले आहे की, बांगलादेश लवकर बाहेर पडला असला तरी, बोर्डाला आयसीसीने हमी सहभाग शुल्क देण्यात यावे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, संघ तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात आणि स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून मूलभूत आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक आहे.
तसेच तिसरी मागणी अशी की , बांगलादेशला त्याची क्रिकेट अर्थव्यवस्था आणि जागतिक मान्यता वाढविण्यासाठी आगामी आयसीसी स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी देण्यात यायला हवी आहे. बोर्डाचा असा देखील विश्वास आहे की आता देशाकडे एक मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि चाहत्यांचा पाठिंबा देखील आहे.
एका नवीन अहवालामध्ये दावा करण्यात आला आहे की, पीसीबीने टी२० विश्वचषकातून माघार घेतल्यानंतर देखील बांगलादेशला आर्थिक भरपाई देऊ केली आहे. याबाबत आता आयसीसीचा प्रतिसाद प्रसिद्ध झाला आहे.एका वृत्तानुसार, “आयसीसीच्या महसुलामधील पूर्ण वाटा मिळावा याची खात्री करण्याशिवाय आयसीसीकडे बांगलादेशला भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही एक नाही.”






