Sexual harassment case: Big relief for bowler Yash Dayal! Allahabad High Court stays arrest
Court gives big relief to bowler Yash Dayal : भारतीय क्रिकेटपटू यश दयालच्या अलीकडे अडचणी वाढल्या होत्या. त्याच्यावर गाझियाबादच्या एका मुलीकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर यश दयालने देखील महिलेने लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देण्याकरता अलाहाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. आता न्यायालयाकडून त्याला या प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने यश दयालच्या अटकेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. यापूर्वी आरसीबीचा यशस्वी गोलंदाज यश दयालने या प्रकरणामध्ये त्याच्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी करणारी रिट याचिका लाहाबाद उच्च न्यायालया दाखल केली होती. यामध्ये त्याच्याकडून त्याच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने या २७ वर्षीय खेळाडूच्या मागणीवर निर्णय दिला आहे.
हेही वाचा : वयाच्या ९० व्या वर्षी मॅरेथॉन धावणाऱ्या फौजा सिंग यांचे निधन; ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
याबाबत अधिक माहिती अशी कि, दयालविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले होते की, त्याच्याकडून लग्नाचे आमिष दाखवून मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते. हा एफआयआर ६ जुलै रोजी गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलिस ठाण्यात कलम ६९ (फसवणुकीद्वारे लैंगिक संबंध) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. यश दयालवर महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी दोघे देखील सुमारे एक वर्ष एकत्र होते. या दरम्यान दयालकडून महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.परंतु नंतर त्यांच्याकडून तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात झाली. कथित पीडितेने असा देखील दावा करण्यात आला आहे कि, क्रिकेटपटू यश दयालने तिला शाहीचा प्रस्ताव वारंवार पुढे ढकलला होता.
हेही वाचा : India vs England : गौतम गंभीरचे पद धोक्यात, वाचा रिपोर्ट कार्ड! टीम इंडियामधून वगळणार?
या सर्व प्रकारानंतर तिला कळले की दयालचे अन्य महिलांशी देखील शारीरिक संबंध आहेत.या महिलेने सुरुवातीला यूपी सीएमच्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तक्रार २१ जून रोजी केली गेली होती.
क्रिकेटपटू यश दयाल सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचहा एक भाग आहे. याआधी त्याने त्याच्या कारकिर्दीत २७ प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत. या दरम्यान त्याने ८४ विकेट देखील घेतल्या आहेत. आरसीबीने आयपीएल २०२५चे विजेतेपद पटकावले. तेव्हा दयाल या संघाचा एक भाग होता आणि त्याने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. यश दयालने ७१ टी-२० सामन्यांमध्ये ६६ फलंदाजांना बाद केले आहे. त्याच वेळी, त्याने ४३ आयपीएल सामन्यांमध्ये ४१ बळी टिपले आहेत.