फोटो सौजन्य – X
भारताच्या संघाने मागिल काही महिन्यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. टीम इंडीयाला न्युझीलंडच्या संघाने व्हाइट वाॅश केले, त्याचबरोबर बाॅर्डर गावस्कर ट्रॅाफीमध्ये देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलचे पद हुकले. शुभमन गिलच्या युवा संघाने ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर यजमान इंग्लंडचा धाडसी सामना केला, परंतु संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
या पराभवानंतर, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील कसोटी क्रिकेट संघाच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि भारतीय संघावर मालिका गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये काही महत्त्वाच्या कामगिरी केल्या आहेत, परंतु कसोटी क्रिकेटमधील सततच्या अपयशांमुळे त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर भारत इंग्लंडमध्ये ही मालिका गमावला तर बीसीसीआय गंभीरच्या भविष्याचा पुनर्विचार करू शकते.
आतापर्यंत गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ गमावले आहेत, चार जिंकले आहेत आणि फक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागला, जो १२ वर्षांनंतर पहिलाच घरच्या कसोटी मालिकेतील पराभव होता. त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा १-३ असा पराभव झाला.
IND VS ENG : शुभमन गिलच्या वक्तव्याने उडवली खळबळ! ऋषभ पंतमुळे टीम इंडियाचा पराभव?
इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत भारताने लीड्स येथे पहिली कसोटी गमावली, त्यानंतर एजबॅस्टन येथे पुनरागमन करून मालिका १-१ अशी बरोबरी केली, परंतु तिसऱ्या सामन्यात पुन्हा पराभव पत्करावा लागला. आता दोन सामने शिल्लक आहेत आणि संघासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान आहे.
भारताला आता मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे चौथा कसोटी सामना खेळायचा आहे. हा सामना २३ जुलैपासून सुरू होईल. त्यानंतर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. जर भारताला मालिका जिंकायची असेल तर त्यांना हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारताला एक सामना बरोबरीत सोडण्याव्यतिरिक्त एक सामना जिंकावा लागेल.