फौजा सिंग(फोटो-सोशल मीडिया)
Fauja Singh passes away : माजी मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पंजाबमधील जालंधर येथील त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या ११४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूच्या बतमीला लेखक खुशवंत सिंग यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.
खुशवंत सिंग यांनी फौजा सिंग यांचे चरित्र ‘द टर्बनेड टॉर्नाडो’ लिहिले आहे. त्यांच्याकडून फौजा सिंग यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की “माझा टर्बनेड टॉर्नाडो आता नाही. फौजा सिंग यांच्या मृत्यूची बातमी आपण सर्वांना दुःखाने सांगावी लागत आहे. आज(सोमवारी) दुपारी ३:३० वाजता, त्यांच्या गावी बायस येथे रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाकडूंन त्यांना धडक दिली. माझ्या प्रिय फौजा, तुमच्या आत्म्याला शांती मिळो.”
हेही वाचा : IND VS ENG : शुभमन गिलच्या वक्तव्याने उडवली खळबळ! ऋषभ पंतमुळे टीम इंडियाचा पराभव?
खुशवंत सिंग यांनी सांगितले आहे, की त्यांनी फौजा सिंग यांच्या कुटुंबाशी बोलणे झाले आहे. त्यांनि मृत्यूच्या बातमीला पुष्टी दिली आहे. केली आहे. रस्त्यात एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनि अखेरचा श्वास घेतला.
पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया यांच्याकडून फौजा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “मॅरेथॉन धावपटू आणि चिकाटीचे प्रतीक असणारे सरदार फौजा सिंग यांच्या निधनानंतर ते माझ्यासोबत अतुलनीय उत्साहाने ड्रग्जमुक्त, रंगला पंजाब मार्चमध्ये सहभागी झाले होते. त्यांचा वारसा ड्रग्जमुक्त पंजाबसाठी प्रेरणादायी राहणार आहे. ओम शांती ओम.”
फौजा सिंग यांना पगडीवाला टोर्नाडो या नावाने देखील ओळखले जात होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९११ रोजी पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील व्यास या गावी झाला. वयाच्या ९० व्या वर्षी मॅरेथॉन धावण्याचा पराक्रम करून त्यांनी जगाला आश्चर्यचकित केले होते. वयाच्या या शेवटच्या टप्प्यावर, जेव्हा एखादी व्यक्ती आराम करायला प्राधान्य देते. तेव्हा फौजा सिंग यांनी मॅरेथॉन धावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या निर्णयाने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.
हेही वाचा : कसोटी क्रिकेटमध्ये 400+ विकेट्स घेणाऱ्या क्लबमध्ये सामील झाला मिचेल स्टार्क! वाचा टाॅप 5 गोलंदाज
२००४ मध्ये, फौजा सिंग त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची पहिली मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली होती. ही मॅरेथॉन लंडनमध्ये पार पडली होती. त्यानंतर, २०११ मध्ये, त्यांनी वयाची १०० वर्षे ओलांडली. त्यानंतर त्यांनी टोरंटो मॅरेथॉन देखील पूर्ण केली. या काळात फौजा सिंग यांनी १००+ श्रेणीत विश्वविक्रम नोंदवला होता. या काळात, फौजा सिंग जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू ठरले होते. लोक अजूनही त्याच्या वयाला आणि त्याच्या जिद्दीला सलाम करत असतात.