फोटो सौजन्य : X
Shikhar Dhawan Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा फायनलचा एक पक्का झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पंजाब किंग्सला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत करून फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. रजत पाटीदारचे नेतृत्वात संघाने कमालीची कामगिरी केली. आज क्वालिफायर २ चा सामना खेळवला जाणार आहे हा सामना मुंबई आणि पंजाब या दोन संघांमध्ये होणार आहे. या संघांमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ फायनलमध्ये रॉयल चॅलेंजेस बंगळुरूच्या संघासोबत लढणार आहे. पंजाबच्या संघाला आजच्या सामना मुंबईचा आव्हान असणार आहे मुंबईच्या संघाने गुजरातच्या संघाला पराभूत करून क्वालिफायर 2 मध्ये स्थान पक्के केले आहे.
आज दोन्ही संघाची कामगिरी कशी राहणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल. आयपीएल 2025 चा विजेता कोण होणार यासाठी चाहत्यांना आणखी एक सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण आता भारताचा माजी खेळाडू शिखर धवन याने आयपीएल २०२५ च्या संघाचा डावा ठोकला आहे त्यामुळे संपूर्ण क्रिकेट खळबळ उडाली आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत धवनने आयपीएल २०२५ चा विजेता म्हणून मुंबई इंडियन्सची निवड केली आहे. तो म्हणाला की, मुंबई सध्या एक अतिशय संतुलित आणि मजबूत संघासारखी दिसते, ज्याने योग्य वेळी वेग मिळवला आहे. धवन म्हणाला, ‘मी मुंबई इंडियन्ससोबत आहे, त्यांनी ज्या पद्धतीने वेग पकडला आहे तो अद्भुत आहे.’ त्यांचा संघ खूप मजबूत आणि संतुलित आहे. त्यांच्या या विधानाने अनेकांना धक्का बसला आहे. कारण तो अनेक वर्षे पंजाबकडून खेळला आहे, त्यानंतर चाहत्यांना तो पंजाबवर पैज लावेल अशी अपेक्षा होती.
IPL 2025 : ‘काहीतरी आहे…’ आर अश्विनने मुंबई इंडियन्सच्या विजयावर केले प्रश्न उपस्थित
धवन २०२२ ते २०२४ पर्यंत पंजाब किंग्जकडून खेळला आणि १७ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. तथापि, निकाल त्याच्या बाजूने नव्हते, जिथे पंजाबने त्याच्या नेतृत्वाखाली फक्त सहा सामने जिंकले. या काळात तो जखमी झाला, त्यानंतर तो अनेक सामने गमावला. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नसला तरी वैयक्तिकरित्या त्याची कामगिरी चांगली होती. पंजाबसोबतच्या त्याच्या तीन हंगामात, धवनने ३७.८८ च्या प्रभावी सरासरीने ९८५ धावा केल्या आणि अनेकदा संघाच्या डावांना एकजुटीने सांभाळताना दिसला.