फोटो सौजन्य : Mumbai Indians/Youtube
मुंबई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे, या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो संघ फायनलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. एलिमिनेटर सामन्यामध्ये मुबंईच्या संघाने गुजरातच्या संघाला पराभुत करुन क्वालिफायरमध्ये स्थान पक्के केले आहे. या सामन्यापूर्वी, अनुभवी भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनने एक मनोरंजक घटना शेअर केली आहे, ज्यामुळे पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ज्येष्ठ पत्रकार विमल कुमार यांच्याशी बोलताना अश्विन म्हणाला की, नशीब मुंबईवर इतके कसे अनुकूल आहे? अश्विनने २०१८ च्या एका सामन्याचे उदाहरणही दिले जिथे अनुभवी फलंदाज रोहित शर्माला गुजरात टायटन्सविरुद्ध एलिमिनेटरमध्ये तीन जीवदान देण्यात आले होते. अश्विनने सांगितले की, ही घटना २०१८ सालची आहे, जेव्हा तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता.
PBKS VS MI: नाही ते नाही होऊ शकत…! रोहित शर्माने लहान मुलाच्या प्रश्नावर असे का म्हटले?
तो म्हणाला, ‘२०१८ मध्ये जेव्हा मी पंजाबचा कर्णधार होतो, तेव्हा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आम्ही त्यांचा स्कोअर ८०/५ पर्यंत कमी केला होता. पण अचानक फ्लडलाइट्स गेले आणि सामना सुमारे २० मिनिटे थांबवण्यात आला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा मुंबईने १८० पेक्षा जास्त धावा केल्या. अश्विनचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
Ravi Ashwin said “When I was the captain of KXIP in 2018, we had a match with MI & MI were 80/5, then suddenly the floodlights went off for 20 minutes. After the match resumed, Mumbai Indians went on to score 180+ runs.”
What’s your take on this🤔pic.twitter.com/BEq8EsA0k8
— Richard Kettleborough (@RichKettle07) May 31, 2025
अश्विनचा मुद्दा असा होता की अचानक झालेल्या ब्रेकमुळे पंजाबच्या गोलंदाजांची लय बिघडली, ज्यामुळे नंतर मुंबईच्या फलंदाजांना स्थिरावण्यासाठी वेळ मिळाला. अश्विनने थेट कोणालाही दोष दिला नसला तरी, त्याच्या विधानावरून असे दिसून येते की तो त्या घटनेला पूर्णपणे सामान्य मानत नाही. “प्रत्येकाचे स्वतःचे नशीब असते,” तो म्हणाला. पण मुंबईत नेहमीच असे का घडते? त्यांना इतके नशीब कुठून मिळते हे आपण शोधले पाहिजे. काहीतरी ना काही असतंच.
आजच्या सामन्यात मुंबई इंडीयन्सच्या संघासमोर पंजाब किंग्स आव्हान उभे करु शकते. नरेंद्र मोदी मैदानावर मुंबई इंडीयन्सच्या संघाचा रेकाॅर्ड फार काही चांगला राहिला नाही त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिल हे पाहणे मनोरंजक ठरेल.