फोटो सौजन्य : X
निकोलस पुरण निवृती : आयपीएल 2025 चा हा सिझन संपला आहे, या सिझनमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने बाजी मारली. या सिझनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये चर्चेत राहिलेला तो म्हणजेच लखनऊ सुपर जायंट्सचे स्टार फलंदाज. यामध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श चर्चेत होता. त्याचबरोबर वेस्ट इंडीजचा फलंदाज स्टार निकोलस पुरण याने फलंदाजीने सुरुवातीच्या काळामध्ये धुमाकुळ घातला होता. त्याने आयपीएल 2025 चे सुरुवातीचे काही आठवडे ऑरेंज कॅपवर राज्य करत होता. आता त्याच्या संदर्भात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. पूरनने आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी धमाकेदार कामगिरी केली होती, परंतु त्याच्या निवृत्तीमुळे आता क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पूरनच्या निवृत्तीचे कारण आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी त्याचे खूपच कमी शुल्क असल्याचे मानले जाते, जे फ्रँचायझी लीगपेक्षा खूपच कमी होते.
९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत, निकोलस पूरनने ६१ एकदिवसीय आणि १०४ टी-२० सामने खेळले. या काळात त्याने उत्कृष्ट फलंदाजी आणि अद्भुत विकेटकीपिंग देखील केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच, निकोलस पूरन वेगवेगळ्या देशांच्या फ्रँचायझीसाठी लीगमध्ये खेळात होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे कारण पूरनचे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी कमी मानधन असल्याचे मानले जाते. अहवालानुसार, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड पूरनला एका एकदिवसीय सामन्यासाठी १,९६,९४६ रुपये देत असे, त्याशिवाय त्याला एका टी-२० सामन्यासाठी १,४८,५६६ रुपये मिळत असत.
इंडीयन प्रीमियर लीग 2025 च्या निकोलस पुरन यांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाले तर तो या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघाकडून खेळला. यामध्ये त्याने 14 सामन्यामध्ये त्याने 524 धावा केल्या. त्याचबरोबर 5 अर्धशतक झळकावले. त्याने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी केली होती पण त्यानंतर तो शेवटच्या काही सामन्यात फेल ठरला होता. एवढेच नव्हे तर त्याने या सिझनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत अव्वल स्थानावर होता. त्याने आयपीएल 2025 मध्ये 40 षटकार मारले. त्याने या सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्याने शक्ती प्रदर्शन दाखवले.