फोटो सौजन्य : X
भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये काल दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस पार पडला या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने. पहिल्या डावामध्ये 348 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावामध्ये सात विकेट्स गमावून 417 धावा करून डाव घोषित करण्यात आला. यामध्ये भारताचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरण याने कमालीची कामगिरी केली. अभिमन्यू हा पहिला डावामध्ये फेल ठरला पण त्याने दुसऱ्या डावामध्ये 80 धावा केल्या होत्या तर के एल राहुल याने अर्धशतक झळकावले आणि 51 धावा केला.
यशस्वी जयस्वाल या कसोटी सामन्यात फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याचबरोबर मागील सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा करून न्याय देखील या दुसऱ्या कसोटीमध्ये फेल ठरला. या सामन्यांमध्ये दुसरा डावांमध्ये तनुष कोटीयान हा हिरो ठरला.तनुष कोटियन याने संघासाठी 90 धावांची खेळी खेळली. भारताच्या संघाने सात विकेट्स गमावल्यानंतर तनुष कोटियान आणि अंशुल कम्बोज या दोघांनी चांगली भागीदारी केली. अंशुल कंबोज याने देखील अर्धशतक झळकावले त्याने 51 धावांची खेळ खेळले आणि नाबाद राहिला.
कॅप्टन कूलला आयसीसीने केले सन्मानित! MS Dhoni ला 12 वर्षानंतर मिळालं मेहनतीचं फळ
चौथ्या दिनी फलंदाजी करून भारताच्या संघाने इंग्लंड लायन्स समोर 439 धावांचे लक्ष उभे केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या चौथ्या दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंड लायन्सच्या संघाने ११ ओव्हर खेळल्या आहेत यामध्ये त्यांनी ३२ धावा करून ३ विकेट्स गमावले आहेत. भारतीय संघाच्या चौथ्या दिनाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर तुषार देशपांडे याने संघाला १ विकेट्स मिळवून दिला त्याने थॉमस हॅनिस याला बाहेरचा रस्ता दाखवला.
थॉमस हॅनिस याने ७ धावा करून विकेट गमावली. तर दोन विकेट्स अंशुल कंबोज याने घेतले. त्याने जॉर्डन मॅथ्यू आणि एमिलियो गाय या दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.