शुभमन गिल (फोटो- ians)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये कर्णधार शुभमन गिलडे फलंदाज म्हणून नवा इतिहास रचण्याची संधी असणार आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिल याने २०२६ या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या वर्षात १००० एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला आता केवळ १०५ रन्सची गरज आहे.
गेल्या अनेक सामन्यांमध्ये कर्णधार शुभमन गिल हा जबरदस्त फॉर्ममध्ये खेळताना दिसजन येत आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने मोठे मोठे सिरीज आणि सामने जिंकले आहेत. शुभमन गिल सध्या ज्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, ते पाहता अवघ्या १०५ धावांचे हे आव्हान पार करणे त्याच्यासाठी फारसे कठीण नसणार आहे. शुभमन गिल 105 रन्स करताच हा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे.
IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल
शुभमन गिल (भारत): ८९५ रन्स
बेन डकेट (इंग्लंड): ७३७ रन्स
पवन रत्नायके (श्रीलंका): ६९२ रन्स
जो रूट (इंग्लंड): ६८० रन्स
गेरहार्ड इरास्मस (नामिबिया): ६६२ रन्स
टी-२० चा कर्णधार श्रेयस अय्यरला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे, ऋतुराज गायकवाडला यावेळीही बाहेर बसावे लागू शकते. मधल्या फळीत केएल राहुल विकेटकीपर -फलंदाज म्हणून खेळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ईशान किशनला बेंचवर बसावे लागू शकते.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
Ans: कर्णधार शुभमन गिलने 2026 मध्ये आतापर्यंत 895 रन्स केल्या आहेत.
Ans: भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना उद्या होणर आहे.






