Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र संघाकडून पदकांचा वर्षाव; खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा; चेन्नई, तामिळनाडू, जिम्नॅस्टिक्समध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य, मल्लखांबमध्ये सुवर्णपदकांचा चौकार

  • By युवराज भगत
Updated On: Jan 23, 2024 | 09:12 PM
महाराष्ट्र संघाकडून पदकांचा वर्षाव; खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा; चेन्नई, तामिळनाडू, जिम्नॅस्टिक्समध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य, मल्लखांबमध्ये सुवर्णपदकांचा चौकार
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धेचा आजचा पाचवा दिवस पदकांच्या वर्षावाने गाजविला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिवसभरात जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, योगासने, सायकलिंग, स्क्वॉश या खेळांमध्ये तब्बल १० सुवर्ण, ५ रौप्य तर २ कांस्य असे एकून १७ पदकांची कमाई केली. रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ताला आणखी दोन सुवर्णपदके ; किमया कारलेचीही सोनेरी कामगिरी

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व कायम राखताना आज आपल्या खात्यात आणखी तीन सुवर्णपदकांची भर घातली. त्याचे श्रेय दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या संयुक्ता काळे व एक सुवर्णपदक जिंकणाऱ्या किमया कारले यांना द्यावे लागेल.

महाराष्ट्राची सुवर्णकन्या म्हणून ख्याती मिळवलेल्या संयुक्ता हिने आज बॉल व रिबन या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये तिने अतिशय नेत्र दीपक कौशल्य दाखविले. हूप या प्रकारात तिला रुपेरी कामगिरीवर समाधान मानावे लागले. संयुक्ता हिने काल वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

किमया हिने हूप या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. आजपर्यंत तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर सव्वाशेहून अधिक पदकांची कमाई केली आहे. तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील बॉल या प्रकारात २६.३० गुणांची नोंद करीत या स्पर्धेत सर्वाधिक गुण नोंदवणारी भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळाला होता. आजपर्यंत तिने आंतरराष्ट्रीय निमंत्रित स्पर्धेत एका सुवर्णपदकासह अकरा पदके जिंकली आहेत. ती बारावीत शिकत असून तिला क्रीडाशास्त्र अभ्यासक्रमात पदवी घ्यायची आहे. किमया व संयुक्ता या दोन्ही खेळाडू ठाणे येथे फिनिक्स अकादमीत पूजा व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईच्या परीना मदनपोत्रा हिने क्लब्ज या प्रकारात रौप्य पदकाची कमाई करीत महाराष्ट्राच्या खात्यामध्ये आणखी एका पदकाची भर घातली.

मल्लखांबमध्येही महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार

मल्लखांबमध्येही महाराष्ट्राने वर्चस्व गाजवताना आज चार सुवर्णपदके जिंकून धमाका केला. महाराष्ट्राने मुलांच्या गटात १२५.४५ गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. या संघामध्ये वेदांत शिंदे, रणवीर मोहिते, शार्दुल ऋषिकेश, निशांत लोखंडे, मृगांक पाथरे, आयुष कलंगे यांचा समावेश होता. मुलींच्या गटात महाराष्ट्रालाच सांघिक सुवर्णपदक मिळाले. आर्या साळुंखे, भक्ती मोरे, प्रणाली मोरे, सई शिंदे, पलक चुरी व वैष्णवी पवार यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ८३.८० गुणांची नोंद केली.

सुनील गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव

मुलांच्या विभागात महाराष्ट्राच्या शार्दुल ऋषिकेश यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्याने टांगता, पुरलेला व दोरीचा मल्लखांब या तिन्ही प्रकारात अप्रतिम कौशल्य दाखवीत हे यश संपादन केले. त्याला २५.४५ गुण मिळाले. तो चेंबूर येथील जवाहर विद्या भवन केंद्रात सुनील गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुलींच्या वैयक्तिक सर्वसाधारण गटात महाराष्ट्राच्या प्रणाली मोरे व पलक चुरी यांनी अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्य पदक जिंकले. प्रणाली हिने १६.९५ गुणांची नोंद केली तर पलक हिला १६.९० गुण मिळाले.‌

तलवारबाजी सांघिक गटात मुलींची सोनेरी कामगिरी

चेन्नईतील तामिळनाडू क्रीडा विद्यापीठातील तलवारबाजीत पदकाची घोडदौड सुरू ठेवत महाराष्ट्राच्या मुलींनी सांघिक गटात सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. सेबर प्रकारात बलाढ्य हरियाणाला शेवटच्या टप्प्यात ४५-४३ गुणांनी नमवून महाराष्ट्राने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अनुभवी कशिष भराड, शर्वरी गोसेवाडे, श्रुतिका चव्हाण, हर्षदा वंजारे या संघाने महाराष्ट्रासाठी प्रथमच सुवर्ण पदक कमावले. आंतरराष्ट्रीय खेळाडू हिमांशी नेगी आक्रमक खेळाच्या जोरावर हरयाणा संघाने ३५-३१ गुणांची आघाडी घेतली होती. परंतु, शर्वरीने तुफानी खेळाचे प्रदर्शन घडविताना सुवर्ण पदक खेचून आणले. पुरुषांच्या फॉईल सांघिक गटात तेजस पाटील, रोहन शहा, वैभव शिंदे व क्रिश परसोडकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. त्यांना प्रशिक्षक अजिंक्य दुधारे, अजय त्रिभुवन, राहुल वाघमारे, अभय देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

आर्टिस्टिक पेअर योगासनामध्ये महाराष्ट्राला सुवर्ण आणि २ रौप्य पदक

योगासनांच्या आर्टिस्टिक पेअर या प्रकारातील मुलांच्या गटात संगमनेर, अहमदनगरच्या यश लगड आणि प्रणव साहू या दोघांनी सुवर्ण, तर आर्यन खरात व तन्मय म्हाळसकर यांनी रौप्य पदक मिळविले. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी असणारे चौघेही विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व किरण वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७ ते ८ तास सराव करतात. पदक जिंकल्यानंतर बोलताना यश आणि प्रणव यांनी योगासानांमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुलीच्या याच प्रकारात निरल वाडेकर व वैदेही मयेकर यांनी रजत कामगिरी केली. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये अनुक्रमे सहावी व सातवीमध्ये शिकत आहेत.

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या वेदांत जाधवला सुवर्ण

महाराष्ट्राच्या वेदांत जाधवने चेन्नईतील तामिळनाडू क्रीडा विद्यापीठच्या सायकल ट्रॅकवर वैयक्तिक २०० मीटर स्प्रींट प्रकारात सुवर्णपदकाची शर्यत जिंकली. पुण्याच्या वेदांत जाधवने केरळचा अनुभवी खेळाडू जोहानला मागे टाकून महाराष्ट्रासाठी सायकलिंगमधील पहिले सोनेरी यश संपादन केले.

महाराष्ट्राचे पदक निश्चित

अंतिम फेरीत केरळकडून खेळणाऱ्या अर्थव पाटीलला कडवी झुंज देत वेदांतने सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. त्याने उपांत्य फेरीत अंदमान निकोबारच्या जोहनला सलग २ शर्यतीमध्ये पराभूत करून महाराष्ट्राचे पदक निश्चित केले होते. पुण्यात प्रशिक्षक दर्शन बारगुजे व दिपाली पाटील यांचे मार्गदर्शनावाखाली तो सराव करतो. या प्रकारातील कांस्यपदक महाराष्ट्राच्या वेदांत ताजणे याने कमवले. नाशिकचा वेदांत ताजणे सध्या दिल्लीत खेलो इंडिया अकादमीत सराव करत असतो.

स्क्वॉशमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदक

महाराष्ट्राच्या निरुपला दुबेने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक मिळविले. निरूपमला तामिळनाडूच्या पूजा आरतीकडून ३-२ असा पराभव स्वीकारावा लागला. सलग तीन लढती जिंकून निरुपमाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत तिने दिलेल्या झुंजीला यश मिळाले नाही.

बास्केटबॉलमध्ये मधील तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राचा तामिळनाडूकडून पराभव ; उपांत्य फेरीत पंजाब बरोबर लढत

बास्केटबॉल मधील मुलींच्या गटात महाराष्ट्राला शेवटच्या साखळी लढतीत यजमान तामिळनाडूकडून ६७-७२ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी तमिळनाडूकडून देसी अंथिया व आर.दीप्ती यांनी अनुक्रमे १६ व १७ गुण नोंदविले. महाराष्ट्राकडून अनया भावसार (२०गुण) व शोमीरा बिडये (१३)गुण यांची लढत अपुरी पडली. महाराष्ट्राने यापूर्वीच पहिले दोन सामने जिंकून उपांत्य फेरी निश्चित केली होती उपांत्य फेरीत त्यांचा पंजाबशी सामना होणार आहे.

Web Title: Shower of medals from maharashtra team khelo india youth sports championships chennai tamil nadu 3 golds 2 silvers in gymnastics four golds in mallakhamb nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2024 | 09:11 PM

Topics:  

  • gymnastics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.