Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Asia Cup: श्री चरणीची कमाल! एका वर्षात सर्वाधिक T20I विकेट्स घेणारी दुसरी भारतीय; पूनम यादवचा विक्रम निशाण्यावर

Women's Asia Cup : भारतीय महिला संघाची युवा फिरकीपटू श्री चरणीने महिला आशिया चषक 2026 मध्ये हाँगकाँगविरुद्ध दोन विकेट्स घेत एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक T20I विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. 2026 मध्ये तिच्या नावावर आता 31 विकेट्स असून तिने दीप्ती शर्माच्या 30 विकेट्सचा टप्पा मागे टाकला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 12:49 PM
श्री चरणीची कमाल! एका वर्षात सर्वाधिक T20I विकेट्स घेणारी दुसरी भारतीय; पूनम यादवचा विक्रम निशाण्यावर

श्री चरणीची कमाल! एका वर्षात सर्वाधिक T20I विकेट्स घेणारी दुसरी भारतीय; पूनम यादवचा विक्रम निशाण्यावर

Follow Us
Follow Us:
  • हाँगकाँगविरुद्ध 2 विकेट्स अन् श्री चरणीच्या नावावर मोठा पराक्रम
  • इतिहास रचण्यासाठी फक्त 5 विकेट्स दूर
  • आता पूनम यादवचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
Women’s Asia Cup: भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू श्री चरणी हिने दमदार कामगिरी करत आणखी एका मोठ्या विक्रमाच्या दिशेने झेप घेतली आहे. महिला आशिया चषक 2026 मध्ये हाँगकाँगविरुद्ध तिने 3.2 षटकांत 16 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह 2026 या कॅलेंडर वर्षातील तिच्या T20I विकेट्सची संख्या 31 झाली आहे. त्यामुळे एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक महिला T20I विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

दीप्ती शर्माला टाकले मागे

या यादीत पूनम यादव अव्वल स्थानावर आहे. तिने 2018 मध्ये 35 T20I विकेट्स घेतल्या होत्या. श्री चरणी 31 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असून दीप्ती शर्माने 2024 मध्ये 30 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे पूनम यादवच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी चरणीला आणखी 4, तर हा विक्रम मोडण्यासाठी 5 विकेट्स आवश्यक आहेत.

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती

हाँगकाँगचा 137 धावांनी धुव्वा

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संपूर्ण संघ 16.2 षटकांत अवघ्या 56 धावांत गारद झाला. भारताने हा सामना तब्बल 137 धावांनी जिंकला. दीप्ती शर्माने 3 विकेट्स, तर श्री चरणी, प्रेमा रावत आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

स्मृती मानधनाचे वादळी शतक

भारताच्या विजयाची पायाभरणी स्मृती मानधनाने केली. तिने अवघ्या 64 चेंडूंत 124 धावा ठोकल्या. तिच्या खेळीत 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान मानधनाने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅट मिळून सर्वाधिक धावा करण्याचा टप्पाही गाठला आणि मिताली राजला मागे टाकले.

टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक

हाँगकाँगवरील दणदणीत विजयामुळे भारतीय महिला संघाने महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आता श्री चरणीच्या कामगिरीकडेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. सध्याचा फॉर्म कायम राहिल्यास याच वर्षात पूनम यादवचा 35 विकेट्सचा विक्रम मोडण्याची तिच्याकडे मोठी संधी आहे.

मर्डेका ११८ टॉवर सर करत अपर्णा उपाध्याय यांची ऐतिहासिक कामगिरी; २८४५ पायऱ्या ४८ मिनिटांत पूर्ण

Web Title: Shree charani second most t20i wickets in calendar year eyes poonam yadav record womens asia cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Womens Asia Cup

संबंधित बातम्या

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय
1

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?
2

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.