Shreyas Iyer Broke Ms Dhoni T20 Captaincy record
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू असून आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने एक सामना जिंकला आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी इंदौरमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना १४ धावांनी जिंकला. या विजयासह, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीचा विक्रम मोडला.
Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आपल्या नेतृत्वाखाली सर्वाधिक वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या संघांच्या कर्णधारांच्या यादीत श्रेयस अय्यरने आता अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघ आणि आयपीएलल या दोघांची एकूण ही आकडेवारी आहे. श्रेयसने १३३ टी-२० सामन्यांचे कर्णधारपद भूषवले असून, या काळात त्याच्या संघाने ३७ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत आता एम.एस. धोनी दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली संघाने ३६ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने एकूण ३३१ सामन्यांचे कर्णधारपद भूषवले आहे.
या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९३ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून २९ वेळा संघाला २०० किंवा त्याहून अधिक धावांपर्यंत पोहोचवले आहे. फॅफ डु प्लेसिसने २७ वेळा संघाला २०० किंवा त्याहून अधिक धावांपर्यंत पोहोचवले आहे, तर रोहित शर्माने २५ वेळा संघाला २०० किंवा त्याहून अधिक धावांपर्यंत पोहोचवले आहे.
IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?






