SL vs BAN: 'Retirement decision emotional..', Angelo Mathews choked up after the last Test match..
SL vs BAN : भारत-इंग्लंड यांच्यात पांच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील लीड्स येथे पहिलं सामना खेळवण्यात येत आहे. तर दुसरीलडे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात देखील कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना दोघांमध्ये अनिर्णित राहिला. सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी शानदार फलंदाजी करत भरपूर धावा केल्या आहेत. बांगलादेशी संघाकडून फलंदाज नझमुल हसन शांतोने दोन्ही डावांमध्य शतक झळकावले. दुसरीकडे, श्रीलंकेकडून पथुम निस्सांका याने देखील शानदार शतक ठोकले.
एकूणच, सामन्यात दोन्ही संघांकडच्या फलंदाजांकडून विरोधी संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. तथापि, सामन्याचा निकाल मात्र लागू शकला नाही, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला आहे. यासोबतच, श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजची शानदार कसोटी कारकीर्दीचा देखील शेवट झाला. त्याने, आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केली होती.
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीचा या खेळाडूने मोडला रेकाॅर्ड! 33 चेंडूत शतक ठोकून उडवली खळबळ
कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या बोलण्याचा आशय असा होटा की, “निवृत्ती जाहीर केल्यापासून त्याला लोकांकडून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आला आहे. त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या लोकांचे त्याने आभार देखील मानले आहे. क्रिकेटचा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात देखील सोपा नव्हता. त्याने त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतारही पाहिले आहेत. तरी देखील तो इथवर येण्यास सक्षम राहिला आहे.
मॅथ्यूज म्हणाला पुढे की, त्यांनी सांगितले की “मला कसोटी क्रिकेट खेळायला खूप आवडतं. कसोटी स्वरूपात निवृत्तीची घोषणा करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. आता वेळ आली आहे की श्रीलंकेचे तरुण खेळाडू देशाला विजय मिळवून देतील. यावेळी आमच्या ड्रेसिंग रूममध्ये अनेक असे आशादायक खेळाडू उपस्थित आहेत. सध्या पथुम निस्सांका शानदार फलंदाजी करताना दिसत आहे.”
हेही वाचा : ENG vs IND : कोणावर संतापला जसप्रीत बुमराह? ड्रेसिंग रूममध्ये कोचशी साधताना दिसला ‘गंभीर’ संवाद, पहा Photo
श्रीलंकेच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने त्यांच्या संघाचे कौतुक देखील केले. तो म्हणाला की, “आमच्या संघासाठी सर्वात मोठी कामगिरी म्हणजे इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकणे तसेच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला ३-० ने पराभूत करणे. माझ्या सहकारी खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.” अशी प्रतिक्रिया अँजेलो मॅथ्यूजने दिली.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने २००९ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आपल्या देशासाठी एकूण ११९ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने ८२१४ धावा केल्या असून ज्यामध्ये १६ शतके आणि ४५ अर्धशतके यांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्याच्या नावावर कसोटीमध्ये ३३ विकेट्स देखील जमा आहेत. त्याने ३४ कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाची धुरा देखील वाहिली आहे.