फोटो सौजन्य – X
इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी याने 18 व्या सीझनमध्ये पदार्पण करून कहर केला होता. त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद गतीने शतक ठोकून इतिहास रचला होता. त्याच्या या खेळीने त्याने सर्वांचाच लक्ष वेधले होते. त्याची ही खेळी चाहते अद्याप विसरलेले नाही. वैभव सूर्यवंशी याने 35 चेंडुमध्ये शतक पुर्ण केले होते. मध्य प्रदेश प्रीमियर लीग 2025 सुरु आहे, यामध्ये आता वैभव सूर्यवंशी याचा रेकाॅर्ड अभिषेक पाठक याने मोडला आहे.
मध्य प्रदेश प्रीमियर लीग 2025 मध्ये, अभिषेक पाठकने फक्त 33 चेंडूत शतक ठोकून पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या स्फोटक शतकी खेळीत अभिषेकने वैभवपेक्षा जास्त षटकार मारले. सध्या भारतात मध्य प्रदेश लीग खेळली जात आहे. ज्यामध्ये तरुण खेळाडू धमाल करत आहेत. या लीगमध्ये खेळल्या गेलेल्या बुंदेलखंड बुल्स आणि जबलपूर रॉयल लायन्स सामन्यात अभिषेक पाठकची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली.
SL vs BAN सामन्यात WTC पाॅइंट टेबलचे खाते उघडले! नजमुल हुसेन शांतोचे सलग दुसरे शतक, पण सामना…
बुंदेलखंड बुल्सकडून फलंदाजी करताना अभिषेकने फक्त ३३ चेंडूत शतक झळकावून टी-२० क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली. या सामन्यात त्याने ४८ चेंडूत १३३ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १५ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. यासह, त्याने आयपीएल २०२५ मध्ये ३५ चेंडूत शतक झळकावणारा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीलाही मागे टाकले आहे. ज्यामध्ये ११ षटकारांचा समावेश होता.
Abhishek Pathak’s sky rockets bags the AISECT Skillful 6️⃣s for clearing the ropes in style! 🚀#adanimpleaguet20 |#adanimadhyapradeshleaguet20 | #adanimpleaguewt20 | #bbuvsjrl pic.twitter.com/y1QuIpNDzu
— Madhya Pradesh League (@MPLeagueT20) June 21, 2025
एमपीएल २०२५ च्या १८ व्या सामन्यात बुंदेलखंड बुल्स आणि जबलपूर रॉयल लायन्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बुंदेलखंडने २० षटकांत ६ गडी गमावून २४६ धावा केल्या. यामध्ये अभिषेक पाठकचे १३३, करणचे ४५ आणि गौतम जोशीचे २४ धावा समाविष्ट होते. जबलपूर रॉयल लायन्सकडून गोलंदाजी करताना पंकज पटेलने ४ षटकांत ३१ धावा देत ४ विकेट घेतल्या.
आयपीएल 2025 झाल्यानंतर अनेक क्रिकेट लीग सुरु आहेत, त्यानंतर अनेक राज्यामध्ये अनेक क्रिकेट लीग खेळवले जात आहेत. महाराष्ट्र लीग सध्या सुरु आहे, त्याआधी महाराष्ट्रामध्ये मुंबई लीग पार पडले होते.