
Virat Kohli Birthday Special: 'King' Kohli's 'those' special innings in ODI cricket history; They earned him the title of 'Run Machine'
Virat Kohli Birthday Special : आज भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीचा ३७ वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात सातत्य, उत्साह आणि आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून काम करणारा विराट कोहली हा एक खेळाडू आहे. त्याला भारतीय संघाची ‘रनमशीन’ म्हटले जाते. त्याच्या अनेक खेळींमुळे भारताने अविस्मरणीय असे विजय मिळवले आहेत. विराट कोहली धावांचा पाठलाग करताना अधिक आक्रमक झालेला दिसतो. त्याच्या काही खास खेळींबद्दल आपण आज जाणून घेऊया.
पाकिस्तानने भारतासमोर ३३० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते आणि भारताची सुरुवात खराब झाली होती. त्यानंतर, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येऊन, त्याने अविस्मरणीय कामगिरी करत फक्त १४८ चेंडूत १८३ धावा फटकावल्या होत्या. या खेळीत त्याने २२ चौकार आणि दोन षटकार मारले होते. सचिन तेंडुलकरसोबतच्या त्याच्या भागीदारीने सामना भारताच्या दिशेने फिरवला.
हेही वाचा : क्रिकेट विश्वात खळबळ! ड्रग्ज अॅडिक्ट खेळाडूची कारकिर्द उद्ध्वस्त! संघातून कायमची हकालपट्टी
न्यूझीलंडने भारतासमोर २८६ धावांचे लक्ष्य दिले होते. सुरुवातीलाच भारताला मोठे झटके बसले, परंतु, कोहली आणि धोनी यांच्यातील भागीदारीने सामना फिरला. कोहलीने या सामन्यात १२० चेंडूत नाबाद १५४ धावा केल्या होत्या. ही खेळी त्याच्या शांत मनाचे आणि धोरणात्मक विचारसरणीचे एक अद्वितीय उदाहरण म्हणून सांगितले जाते.
केपटाऊनच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज संघर्ष करत असताना कोहलीने एका टोकाला बाजू सावरत, त्याने १५९ चेंडूत नाबाद १६० धावांची खेळी केली आणि भारताला मोठी धावसंख्या गाठून देण्यास मोठी भूमिका बाजवली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्धची ही खेळी विराटच्या सर्वात परिपक्व खेळींपैकी एक मानण्यात येते.
वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीने १२९ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकार मारून नाबाद १५७ धावा केल्या होत्या. या खेळीत, त्याने त्याच्या क्लासिक टायमिंग आणि स्ट्राइक रोटेशनने गोलंदाजांना जेरीस आणले होते.
हेही वाचा : Romantic Hardik Pandya : हार्दिक पांड्या धूवत होता गाडी, प्रेयसीने जवळ येऊन केलं किस! Video व्हायरल
श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने आपल्या बॅटने चांगला प्रतिसाद दिला. कोहलीने फक्त ११० चेंडूत १३ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १६६ धावांची खेळी केली होती. या खेळीने त्याच्या कारकिर्दीत एक नवीन अध्याय सुरू झाला.