Hardik Pandya’s girlfriend kissed him : हार्दिक पंड्या हा नेहमी चर्चेत असतो. तो कधी मैदानावरील कामगिरीने चर्चेत असतो वा कधी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येतो. आता तो आणि त्याची नवीन प्रेयसी, महिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यातील अफेअरच्या अफवा आता वास्तवात उतरल्या आहेत. हार्दिक आणि महिका आता एकत्र असून हे त्यांच्या नवीन व्हिडिओ आणि फोटोंवरून समोर आले आहे. हार्दिक पंड्याने स्वतः इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तो आणि महिका शर्मा एकत्र दिसून येत आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये महिका हार्दिकला सार्वजनिकरित्या किस करताना देखील दिसून येत आहे.
हेही वाचा : क्रिकेट विश्वात खळबळ! ड्रग्ज अॅडिक्ट खेळाडूची कारकिर्द उद्ध्वस्त! संघातून कायमची हकालपट्टी
हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याचे व्हिडिओ आणि काही फोटो दिसून येत आहेत. एका व्हिडिओमध्ये हार्दिक त्याची गाडी धुताना दिसत असून व्हिडिओमध्ये, तो डिटर्जंट आणि साबण वापरून त्याची नवीन गाडी धुताना दिसत आहे. पांड्या गाडी स्वच्छ करण्यासाठी कापडाचा वापर करता दिसत आहे. तेव्हा अचानक, त्याची नवीन प्रेयसी, महिका व्हिडिओ फ्रेममध्ये येते. ती पंड्याजवळ येते आणि त्याला कीस करते.
पांड्याच्या प्रेयसीला किस केल्यानंतर, पांड्या गाडी स्वच्छ करण्यासाठी परत येतो. त्याने डिटर्जंट आणि साबणाने गाडी स्वच्छ केल्यावर, तो माहिका शर्माकडे बोट दाखवताना दिसत आहे, त्याच बरोबर तिला त्यावर पाणी ओतण्यास देखील ससांगत आहे. त्यानंतर माहिका नळीतून पाणी ओतते.
हार्दिक पंड्याच्या इंस्टाग्राम पोस्टमधील फक्त एक व्हिडिओ असून त्याने इतर फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक पंड्या आणि त्याची मैत्रीण माहिरा समुद्रात डुबकी मारत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसरा व्हिडिओ त्यांच्या रोड ट्रिपचा आहे. एकूणच, शेअर केलेले सर्व व्हिडिओ आणि फोटो एकाच वेळीचे नसून वेगवेगळ्या वेळेतील आणि दिवसांचे असल्याचे दिसते.






