दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जेपी ड्युमिनीने घेतला घटस्फोट; १४ वर्षांचा संसार एका क्षणात मोडला; काय आहे नेमकं कारण, जाणून घ्या सविस्तर
South African player JP Duminy : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. तथापि, त्यांच्या घटस्फोटाबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. पण दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी खेळाडूचा घटस्फोट झाला आहे. माजी खेळाडू जेपी ड्युमिनीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे आणि त्याने ही माहिती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसेच गोपनीयतेची मागणी केली.
१४ वर्षांनंतर ड्युमिनी त्याच्या पत्नीपासून झाला वेगळा सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी जेपी ड्युमिनीने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत एक हृदयद्रावक बातमी शेअर केली. १४ वर्षांच्या लग्नानंतर ड्युमिनी त्याची पत्नी स्यू ड्युमिनीपासून वेगळे झाले आहेत. ड्युमिनी आणि सू यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून घटस्फोटाची पुष्टी केली आहे.
काय म्हणाला ड्यूमिनी वाचा
ड्युमिनीने चाहत्यांना केले खास आवाहन
ड्युमिनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ड्युमिनी आणि सू यांचे विधान आहे. त्यावर लिहिले होते, ‘खूप विचारविनिमयानंतर, मी आणि स्यूने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या लग्नादरम्यान अनेक संस्मरणीय क्षण एकत्र घालवण्याचे आमचे भाग्य होते आणि आम्हाला दोन सुंदर मुलींचा आशीर्वाद मिळाला. यावेळी, आम्ही या बदलाचा सामना करताना गोपनीयतेची विनंती करतो. आमचे मार्ग वेगळे झाले असले तरी, आम्ही मित्रच राहू, आमचे वेगळेपण मैत्रीपूर्ण आहे. या काळात तुम्ही समजून घेतल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. जेपी आणि स्यू.
ड्युमिनी आणि सू की यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते.
जेपी ड्युमिनीचे पूर्ण नाव जीन पॉल ड्युमिनी आहे. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९८४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झाला. ड्युमिनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० संघाचा उपकर्णधारही राहिला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे आणि या काळात त्याने ९ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत आणि १३० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
वैवाहिक जीवनाची सुरुवात
या माजी खेळाडूने २०११ मध्ये आपले वैवाहिक जीवन सुरू केले होते जे आता १४ वर्षांनी संपले आहे. लग्नानंतर, ड्युमिनी आणि स्यू इसाबेल आणि अलेक्सा या दोन मुलींचे पालक झाले. आता घटस्फोटानंतरही ते दोघेही त्यांच्या मुलींना एकत्र वाढवत राहतील.