SRH vs CSK: Mohammad Shami breaks record against CSK, becomes the first bowler in the world to achieve such feat
SRH vs CSK : आयपीएल २०२५ चा ४३ वा सामना काल शुक्रवारी(२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईचा पराभव केला. हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईने प्रथम फलंदाजीला उतरत १५३ धावा केल्या. प्रतिउत्तरात हैदराबादने १९ व्या षटकातच 154 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात हैद्राबादचा गोलंदाज मोहम्मद शमीने एक विशेष कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये चार वेळा डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. काल चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीने हा इतिहास रचला आहे.
शुक्रवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघासाठी गोलंदाजीचे आक्रमण करण्यास शमीने सुरवात केली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शेख रशीदला माघारी पाठवले. आंध्र प्रदेशचा २० वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज अभिषेक शर्माने पहिल्या स्लिपमध्ये गोल्डन डकसाठी झेल दिला आणि त्याला तंबूत परतावे लागले.
मोहम्मद शमीने चार वेळा पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. असे करणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, त्याने आयपीएल सामन्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर जॅक कॅलिस, केएल राहुल आणि फिल सॉल्ट यांची शिकार केली आहे. आयपीएलमध्ये एकूण ४१ गोलंदाजांकडून डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यात आल्या आहेत. परंतु चार वेळा हा पराक्रम करणारा शमी जगातील एकमेव गोलंदाज ठरला आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने मोहम्मद शमीला १० कोटी रुपयांना संघात समाविष्ट करून घेतले आहे.