वैभव सूर्यवंशी आणि वीरेंद्र सेहवाग(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला आणि सर्वांना चकीत केले. आयपीएल लिलावात जेव्हा राजस्थानने या युवकासाठी कोट्यवधी रुपये मोजले, तेव्हापासून त्याची चर्चा होती. त्याला खेळण्याची संधी केव्हा मिळते, याची सर्व वाट पाहत होते. पहिल्याच सामन्यात त्याने त्याचे कौशल्य दाखवून दिले. पण, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने या खेळाडूला सल्ला दिला आहे.
हेही वाचा : CSK Vs SRH: कॅप्टन कूलच्या पदरी निराशाच; हैदराबादच्या ‘नवाबां’कडून चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव
वैभवने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात २० चेंडूंत ३४ धावांची खेळी केली होती. यानंतर तो (१६) रॉयल चॅलेंजस बंगळुरूविरुद्ध आक्रमक खेळला, परंतु मोठ्या खेळीपासून वंचित राहिला. या सामन्यानंतर वीरूने आरआरच्या फलंदाजाला सल्ला दिला आहे. वैभवने २० वर्ष आयपीएल खेळण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवायला हवे आणि या वयात कोट्यवधी कमावल्यावर समाधानी राहायला नको. क्रिकबजसोबत बोलताना सेहवागने म्हटले की, त्याने असे बरेच खेळाडू पाहिलेत की जे एक किंवा दोन सामन्यांत चमकले आणि त्यानंतर काहीच करू शकले नाहीत.
सेहवाग म्हणाला, किमान २० वर्षे आयपीएलमध्ये खेळण्याचे लक्ष्य वैभवने ठेवायला हवं. विराट कोहलीला बघा, तो १९ वर्षांचा असल्यापासून खेळतोय आणि आता तो १८वी आयपीएल स्पर्धा गाजवतोय. वैभवनेही त्याचे अनुकरण करायला हवे. तो या आयपीएलपुरता आनंदीत असेल, आता आपण करोडपती बनलो, दणक्यात पदार्पण झालं, पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, असा विचार करत असेल तर कदाचित तो पुढच्या आयपीएलमध्ये आपल्याला दिसणार नाही.
काल आयपीएलचा ४३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवरच्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १५३ धावा केल्या. प्रतिउत्तरात हैदराबादने १९ व्या षटकात 154 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केला. हैदराबादच्या विजयात इशान किशन आणि अनिकेत वर्मा यांनी महत्वाची भूमिका बजावली. आयपीएल २०२५ मधील ९ सामन्यात चेन्नईला ७ पराभव तर केवळ २ च विजय मिळवता आले. या पराभवाने चेन्नई गुणतालिकेत तळाला गेली आहे. तर हैद्राबादची देखील कामगिरी या हंगामात फारसी चांगली राहिलेली नाही. ९ सामन्यात त्यांना केवळ तीनच विजय मिळाले आहेत.