Asia Cup 2025: Sri Lanka win the toss and elect to bowl first! Liton Das' army will take to the field for its second victory
आशिया कप २०२५ स्पर्धेत पाचवा सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश आमनेसामने
बांगलादेश या स्पर्धेत दुसऱ्या विजयाच्या शोधात
श्रीलंका संघ स्पर्धेची विजयी सुरवात करण्यास इच्छुक
Sri Lanka and Bangladesh to face each other in Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ ची स्पर्धा सुरू झाली आहे. आशिया कप यावेळी यूएई येथे खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळवण्यात आले आहेत. आज शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामान्यापूर्वी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, तर बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
बांगलादेशचा या स्पर्धेत दूसरा सामना आहे. याआधी लिटन दास आर्मीने हाँगकाँगवर ७ विकेट्सने विजय मिळवला होता, यामध्ये कर्णधार लिटनने शानदार अर्धशतकीय खेळी केली होती. यावेळी देखील संघाला त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असून स्पर्धेत सलग विजय मिळवण्याचा संघाचा मानस असणार आहे. तर चारिथ असलंका नेतृत्वाखालील श्रीलंका संघ या स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे श्रीलंका या स्पर्धेत विजयी सुरवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत टी-२० मध्ये २० सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी श्रीलंकेने १२ सामने जिंकून आपला दबदबा राखला आहे. तर बांगलादेशला श्रीलंकेविरुद्ध ८ वेळा बाजी मारली आहे. मागील काही काळापासून दोन्ही संघांमध्ये स्पर्धा वाढली असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
बांगलादेश संघ खालीलप्रमाणे
बांगलादेश संघ : लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, जाकेर अली, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकीफ,
श्रीलंका संघ खालीलप्रमाणे
श्रीलंका संघ : चारिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामडू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदु हसरांगा, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना, दुशमंथा चमिरा, कमिंदू मेंडिस