भारतीय महिला हॉकी संघ(फोटो-सोशल मीडिया)
Women’s Hockey Asia Cup 2025 : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. यावेळी पुरुष हॉकी टीमने पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे. तर त्यांच्या पाठोपाठ महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारून विजेतपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताने सुपर-४ च्या शेवटच्या सामन्यात भारताने जपानसोबत १-१ अशी बरोबरी साधून अंतिम फेरीत धडक मारली आहे.
चीनविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर, भारतीय महिला संघाने दमदार खेळ उंचावत महिला हॉकी आशिया कप २०२५ च्या त्यांच्या शेवटच्या सुपर ४ सामन्यात गतविजेत्या जपानविरुद्ध पुनरागमन केले आणि सामना १-१ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवळे. या बरोबरीसह भारताने जपानला अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे.
भारतीय संघाने जपानविरुद्धच्या सामन्याची सुरुवात चांगलीच आक्रमक केली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताने गोल करण्याची उत्तम संधी निर्माण केली होती, परंतु चेंडू साईड पोस्टवर आदळल्याने तो जपानी डिफेंडरकडे परतला. पाच मिनिटांनंतर, सातव्या मिनिटाला, भारताच्या ब्युटी डंग डंगने जपानी गोलकीपरला चकवत शानदार गोल साधला. ज्यामुळे भारताला १-० अशी महत्त्वाची आघाडी घेता आली.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीमध्येच जपानला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, परंतु भारतीय डिफेंडरने तो होऊ दिला नाही. संपूर्ण क्वार्टरमध्ये जपानने आक्रमक खेळ दाखवला आणि बरोबरी साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत बचावाने त्यांना यश मिळाले नाही. भारताने हाफ टाईमपर्यंत १-० अशी आघाडी कायम राखण्यात यश मिळवले.
जपानने तिसऱ्या क्वार्टरमध्ये देखील आक्रमक खेळ सुरू ठेवला, परंतु भारतीय बचावफळीने त्यानं गोल करण्याची कोणतीही एक संधी दिली नाही. ४० व्या मिनिटाला भारताने आणखी एक गोल केला होता, परंतु आक्रमक वर्तुळाबाहेरून शॉट घेण्यात आला होता परंतु, पंचांकडून नाकारण्यात आला. तिसरा क्वार्टर देखील कोणत्याही गोल करता आला नाही आणि भारत १-० ने आघाडीवर कायम राहिला.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘गंभीर आल्यापासून अर्शदीपवर..’, यूएईविरूद्धच्या सामन्यावरुन आर अश्विनचे ओढले ताशेरे
चौथा क्वार्टर खूप वेगवान घडामोडी करणारा होता. ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू आक्रमक दिसून आले. यामध्ये अखेर जपानने बाजी मारली आणि ५८ व्या मिनिटाला बरोबरीचा गोल साधला. यामुळे स्कोअर १-१ असा बरोबरीत आला. शेवटच्या दोन मिनिटांत दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्याचा प्रयत्न खूप केला, परंतु कोणालाही यामध्ये यश आले नाही आणि सामना १-१ असा बरोबरीत संपला. परिणामी भारतीय महिला संघ अनितं फेरीत पोहचला तर जपान स्पर्धे बाहेर गेला.
बातमी अपडेट केली जात आहे…