फोटो सौजन्य - X
अँजेलो मॅथ्यूज : आयपीएल 2025 चा हंगाम सुरु आहे, याचदरम्यान भारताचे दोन स्टार क्रिकेट खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली होती. या दोघांनीही सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन सर्वानाच धक्का बसला. आता कसोटी क्रिकेटला आणखी एक दिग्गज क्रिकेट खेळाडूने अलविदा केला आहे. श्रीलंकेचा स्टार खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
अँजेलो मॅथ्यूजने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ३८ वर्षीय अँजेलो मॅथ्यूजने २००८ मध्ये पहिल्यांदा श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. मॅथ्यूज २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना दिसला. तथापि, त्याच्या उपस्थितीत संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. तथापि, आता या स्टार अष्टपैलू खेळाडूने कसोटी क्रिकेटपासून स्वतःला दूर केले आहे. तो जवळजवळ १७ वर्षे श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेट खेळला.
LSG vs GT : Mitchell Marsh ने रचला इतिहास! IPL 2025 मध्ये शतक झळकवणारा बनला पहिला परदेशी फलंदाज
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या प्रिय मित्रांना आणि कुटुंबियांना, कृतज्ञ मनाने. माझ्या आवडत्या खेळाच्या स्वरूपाला, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आता आली आहे. मागिल १७ वर्षांपासून श्रीलंकेसाठी क्रिकेट खेळणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान असे त्याने त्याच्या पत्रामध्ये लिहीले आहे. राष्ट्रीय जर्सी घालताना वाटणाऱ्या देशभक्ती आणि सेवेच्या भावनेला काहीही हरवू शकत नाही. माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक चढ-उतारात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या खेळाचा आणि हजारो श्रीलंका क्रिकेट चाहत्यांचा मी आभारी आहे.
A true servant of Sri Lanka Test Cricket. 🙏
Thank you, @Angelo69Mathews, for 17 years of unwavering dedication, leadership, and unforgettable moments in the red-ball format. Your commitment and passion have inspired a generation.
We wish you all the very best as you step away… https://t.co/fo5iosykGH
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) May 23, 2025
तो पुढे म्हणाला की, मी सर्वशक्तिमान देवाचे, माझ्या प्रेमळ पालकांचे, माझ्या सुंदर पत्नीचे आणि अद्भुत मुलांचे तसेच माझे कुटुंब आणि जवळच्या मित्रांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी एकत्रितपणे नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे, मला पाठिंबा दिला आहे आणि प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभे राहिले आहे. एक अध्याय संपला आहे, पण खेळावरील प्रेम कायम राहील. जूनमध्ये बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा माझ्या देशासाठीचा शेवटचा रेड-बॉल सामना असेल.