मिचेल मार्श(फोटो-सोशल मीडिया)
LSG vs GT : आयपीएल २०२५ च्या ६४ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. गुरुवारी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय गुजरात टायटन्सच्या अंगलट आल्याचे दिसले. लखनौ सुपर जायंट्सने मिचेल मार्शच्या(६४ चेंडूत ११७ धावा) शतकाच्या जोरावर २३५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरात २०२ धावाच करू शकले. यावेळी गिल आणि सुदर्शन जोडी आपली कमाल दाखवू शकली नाही आणि अत्याचा फटका हा संघाला बसला. परिणामी गुजरातला ३३ धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात मिचेल मार्शने शतकी खेळी केली, यासह त्याने एक इतिहास देखील रचला आहे.
मिचेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याने सर्व गोलंदाजांवर आपला दबदबा कायम ठेवला. मिचेल मार्शने १७ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १६.५ व्या षटकात अर्शद खानकडून एक धाव घेऊन त्याने शतकाला गवसणी घातली. तो लखनौ सुपर जायंट्सकडून शतक करणारा चौथा फलंदाज बनला आहे. मिचेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
मिचेल मार्शने लखनौसाठी शतक ठोकून तो सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. लखनौसाठी एका डावात सर्वाधिक धावा क्विंटन डी कॉकने केल्या आहेत. क्विंटन डी कॉकने केकेआरविरुद्ध १४० धावांची तुफानी खेळी केली होती. त्यानंतर, मार्कस स्टोइनिसने चेन्नईविरुद्ध १२४ धावांची वादळी खेळी खेळली केली होती. आज ११७ धावा करून मिचेल मार्श तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
मिचेल मार्शने एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत केएल राहुलला देखील मागे टाकले आहे. मिचेल मार्शने या हंगामात ३३ षटकार लगावले आहेत. त्याच्या पुढे फक्त निकोलस पूरन आहे. ज्याने गेल्या वर्षी ३६ आणि या वर्षी ४० षटकार ठोकले आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल गाजवून सोडणारा Vaibhav Suryavanshi परतला घरी, असे झाले खास स्वागत..
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच शॉन मार्श आणि मिचेल मार्श या दोन सख्ख्या भावांनी शतके ठोकून अनोखी कामगिरी केली आहे. २००८ च्या आयपीएलमध्ये शॉन मार्शने शतक ठोकून ऑरेंज कॅप जिंकली होती. आता १७ वर्षांनंतर मिचेल मार्शनेही शतक ठोकून हाच पराक्रम पुन्हा करून दाखवला आहे. अशाप्रकारे, मार्श बंधू आयपीएलमध्ये शतक झळकावणारी पहिली भावा-भावाची जोडी ठरली आहे. बनली आहे.