Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! सहाव्यांदा कोरलं आशिया कपवर नाव

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 12, 2022 | 08:33 AM
श्रीलंकेचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! सहाव्यांदा कोरलं आशिया कपवर नाव
Follow Us
Close
Follow Us:

दुबई : रविवारी आशिया कप २०२२ ( Asia Cup) स्पर्धेतील अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (Shri lanka Vs Paksitan)  या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला असून यजमान श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल आहे. श्रीलंकेसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला असून आशिया कपच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम लढतीत श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते.

अंतिम सामन्याची नाणेफेक पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. श्रीलंकेच्या संघानं २० षटकात ६ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर १७१ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं. श्रीलंकेच्या संघानं पॉवर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले. श्रीलंकेचा निम्मा संघ १० षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. निसांका आणि सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७ धावांची २१ धावांची भागीदारी केली.

श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या चषकात कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यात रुपात संघाला दोन मोठे धक्के बसले.मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण इफ्तिखार ३१ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाजही स्वस्तात माघारी परतला. पाकिस्तानच्या डावातील १७ व्या षटकात हसरंगानं तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. अखेर पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रमोद मादुशाननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, वानिंदु हसरंगाला तीन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, चचमिका करुणारत्नेनं दोन आणि महेश तीक्ष्णानं एक विकेट्स घेतली.

Web Title: Sri lankas resounding victory over pakistan won the asia cup for the sixth time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2022 | 08:33 AM

Topics:  

  • Asia Cup
  • Paksitan
  • Shrilanka

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..
2

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..

अर्शदीप सिंग इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, 1 विकेट घेताच नावावर करेल विक्रम
3

अर्शदीप सिंग इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, 1 विकेट घेताच नावावर करेल विक्रम

Asia Cup 2025 India: आशिया कपसाठी भारतीय टीमची लवकरच घोषणा, शुभमन, यशस्वी आणि साई सुदर्शनला संधी?
4

Asia Cup 2025 India: आशिया कपसाठी भारतीय टीमची लवकरच घोषणा, शुभमन, यशस्वी आणि साई सुदर्शनला संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.