Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकदिवसीय क्रिकेट थांबवा, ऑलिंपिकवर लक्ष द्या…’, ललित मोदींचा ICC ला अजब सल्ला; पहा VIDEO

आयपीएलचे माजी अध्यक्ष राहिलेले ललित मोदी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत बोलताना आयसीसीला एकदिवसीय क्रिकेट थांबवायचा सल्ला दिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 25, 2025 | 03:03 PM
'Stop one-day cricket, focus on Olympics...', Lalit Modi's strange advice to ICC

'Stop one-day cricket, focus on Olympics...', Lalit Modi's strange advice to ICC

Follow Us
Close
Follow Us:

Lalit Modi’s advice to ICC : आयपीएलचे माजी अध्यक्ष राहिलेले ललित मोदी क्रिकेट जगतापासून दूर आहेत, तरी देखील ते चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय बनले आहेत. यावेळी त्यांची चर्चा एकदिवसीय क्रिकेटवरील त्यांच्या विधानाबाबत होत  आहे. यावेळी ललित मोदी यांनी क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी आता थेट आयसीसीसमोर एक प्रस्ताव देखील मांडला आहे.

एक गोष्ट उल्लेखनीय आहे की, जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा भारतात आणण्याचे श्रेय ललित मोदी यांच्याकडे  जाते. जी आता जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून नावारूपाला आली आहे. ललित मोदी ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत बोलत असताना त्याने आयसीसीला ही सूचना केली आहे.

हेही वाचा : Women’s World Cup 2025 : पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी सज्ज! संघाची झाली घोषणा, या तरुण खेळाडूच्या हाती कर्णधारपद

नेमकं काय म्हणाले ललित मोदी?

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत बोलताना ललित मोदी म्हणाले की, “जर कसोटी क्रिकेट दिवसा खेळला गेला तर ते वाईट होण्याची शक्यता आहे. माझा विश्वास आहे की त्यांनी एकदिवसीय क्रिकेट पूर्णपणे बंद करून टाकावे, तर  कसोटी आणि टी-२० सामन्यांसाठी द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यात यावी.”

मोदी पुढे बोलताना म्हणाले की,  “तुम्ही हंगाम कमी करू शकता. लोकांची आता पूर्वीसारखी आठ तास बाहेर जाऊन बसण्याची क्षमता नाही.  त्यामुळे स्टेडियम दररोज भरले जाऊ शकत नाही. मी म्हणतोय की कसोटी सामना दुपारी दोन वाजता खेळवायला सुरवात करायला पाहिजे.”

पुढे मोदी म्हणाले की, “विश्वचषकांची संख्या कमी करण्यात यावी आणि ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करायला हवे.” तसेच ते म्हणाले की, “तुम्ही विश्वचषकांची संख्या कमी करू शकता. विश्वचषक दर 4 वर्षांनी होतो. तुम्ही ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करयला पाहिजे. जगभरात कसोटी विश्व मालिका आयोजित करायला पाहिजे. एकदिवसीय सामन्यांवर तुमचे पैसे खर्च करू नका. त्यामध्ये काही एक अर्थ नाही.”

हेही वाचा : Pujara Retirement : ‘त्याला संघात राहू द्यायला हवं होतं…’, Cheteshwar Pujara च्या निवृत्तीवर शशी थरूर यांची भावुक पोस्ट

ललित मोदींनी भारतात आयपीएलसारखी मोठी क्रिकेट लीग सुरू केली.  त्यामुळे क्रिकेटची दिशा आणि स्थिती या दोन्हीमध्ये बदल झाला. आज आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट इतर क्रिकेट राष्ट्रांच्या तुलनेत खूप पुढे गेलेले आपल्याला दिसत आहे. अशा परिस्थितीत, अनेक लोक म्हणतात की आयसीसीला त्यांचा सल्ला अवडण्याची शक्यता आहे. आयसीसी शक्य तितक्या सर्व प्रकारे क्रिकेटला चांगले बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Stop one day cricket lalit modis advice to icc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • IPL
  • Lalit Modi

संबंधित बातम्या

IPL मधून पहिल्यांदा निवृत्तीनंतर आता आर. अश्विन फ्रँचायझी क्रिकेटमध्ये परतणार, भारतात नाही तर परदेशी भूमीवर कहर करणार!
1

IPL मधून पहिल्यांदा निवृत्तीनंतर आता आर. अश्विन फ्रँचायझी क्रिकेटमध्ये परतणार, भारतात नाही तर परदेशी भूमीवर कहर करणार!

Zaheer Khan: मोठी बातमी! झहीर खानने लखनऊ सुपर जायंट्स केला राम राम; जस्टिन लँगरमुळे सोडली साथ
2

Zaheer Khan: मोठी बातमी! झहीर खानने लखनऊ सुपर जायंट्स केला राम राम; जस्टिन लँगरमुळे सोडली साथ

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…
3

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…

क्रिकेटप्रेमींच्या खिशाला बसणार फटका, IPL चे तिकीट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार
4

क्रिकेटप्रेमींच्या खिशाला बसणार फटका, IPL चे तिकीट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.