
MS Dhoni
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून महेंद्रसिंह धोनी एकही सामना खेळू शकला नव्हता. त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदानात दिसला नाही. अनेकदा त्याने नेट्समध्ये सराव केल्याचे समोर आले होते. मात्र तो अधिकृत सामना खेळू शकला नव्हता. सीएककेचा माजी फलंदाज बद्रिनाथने धोनीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या माहितीनुसार, ‘महेंद्रसिंह धोनी स्वतःला इपॅक्ट प्लेयर म्हणून पाहत नाही. तो पूर्ण वेळ मैदानावर विकेटकिपर म्हणून खेळण्यास पसंती देतो. ‘
पुढे बद्रिनाथ म्हणाला, ‘मी इपॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार नाही असे धोनीने मला वैयक्तिकरित्या सांगितले होते. धोनी स्वतःला 20 ओव्हर खेळणारा विकेटकिपर म्हणून पाहतो. बद्रीनाथच्या मते, जर धोनीने इम्पॅक्ट प्लेअर खेळला, तर चेन्नई सुपर किंग्जला फायदा मिळू शकतो. तसेच धोनीचे शरीर दीर्घकाळ सतत खेळण्याचा ताण सहन करू शकत नाही.
जर धोनीने मेंटॉर किंवा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली, तर गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्ससाठी किंवा सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी बजावलेल्या भूमिकेप्रमाणेच धोनी सीएसकेच्या थिंक टँकचा मुख्य चेहरा बनेल.धोनीने अजूनही अधिकृत निवृत्ती जाहीर केलेली नसल्यामुळे, त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना सीएसकेकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि एमएस धोनी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.