Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पांड्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह; थेट IPL 2027 मध्येच खेळणार?

Hardik Pandya out from team india for 6 months: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीबाबत एक अपडेट समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 07:44 PM
Hardik Pandya

Hardik Pandya

Follow Us
Follow Us:
  • भारताला मोठा फटका बसणार?
  • हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे वाढली चिंता
  • मैदानावर परतण्यासाठी लागणार आणखी वेळ?
Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची तयारी करत आहे. दरम्यान, टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत आता एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या आयपीएल २०२६ पासून मैदानावर दिसलेला नाही. दरम्यान, हार्दिकची दुखापत अधिकच गंभीर झाली असून तो पुढील सहा महिने मैदानावर दिसण्याची शक्यता कमी आहे. (Hardik Pandya out from team india for 6 months)

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी

हार्दिक पांड्या ६ महिन्यानंतरच मैदानावर परतणार?

वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पांड्या आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात जखमी झाला. यानंतर तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हार्दिक मैदानात परतणार होता. मात्र, फिटनेसवर काम करत असताना त्याला पुन्हा दुखापत झाली, त्यामुळे तो अजूनही क्रिकेटपासून दूर आहे. आता एका नवीन वृत्तानुसार, हार्दिकची दुखापत अधिक गंभीर असल्याचे सांगतिले जात आहे. त्यामुळे पांड्या आता दीर्घ काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

वृत्तानुसार, स्टार खेळाडू हार्दिक पांड्या तीन आठवड्यांनंतरच मैदानावर धावण्यास सुरुवात करू शकेल. त्यानंतर, पुढील आठ आठवड्यांमध्ये त्याच्या रनिंग लोड हळूहळू वाढवला जाईल. पांड्याला पूर्ण तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी बराच वेळ लागेल. पांड्या त्याच्या पोटरीच्या आतील भागाला झालेल्या स्ट्रेस इंज्युरीने त्रस्त आहे. यामुळेच तो बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बराच काळ घालवत आहे. पांड्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या फिटनेसवर काम करण्यास सुरुवाच करेल. परंतु, भारतीय संघ फेब्रुवारीमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. पांड्या कसोटी संघाचा भाग नाही, त्यामुळे तो थेट २०२७ च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो.

पांड्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही दिसणार नाही

हार्दिक पांड्या या हंगामात देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही. पांड्या तंदुरुस्त होईपर्यंत विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संपलेल्या असतील. परिणामी, पांड्याला थेट आयपीएल २०२७ च्या आव्हानात्मक खेळाला सामोरे जावे लागेल. बीसीसीआय सध्या पांड्याबाबत कोणतीही घाई करत नाहीये, म्हणूनच त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ दिला जात आहे.

२०२७ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याची गरज आहे. त्यामुळे, ती स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून संघ त्याला पूर्ण वेळ देत आहे. सध्या, संघ व्यवस्थापन पांड्याच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. त्यामुळे, नितीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे यांना पूर्ण संधी दिली जात आहे. याच कारणामुळे, नितीश कुमार रेड्डीला न्यूझीलंड दौऱ्यावर अंतिम ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?

Web Title: Hardik pandya injury update will come back after 6 months directly ipl 2027 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • IPL 2027

संबंधित बातम्या

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी
1

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर
2

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?
3

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्समध्ये मोठा भूकंप! आयपीएलचे विजेतेपदं जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गजाने सोडली साथ
4

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्समध्ये मोठा भूकंप! आयपीएलचे विजेतेपदं जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गजाने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.