
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
एकिकडे आंतरराष्ट्रिय मालिका सुरु आहेत, तर भारतामध्ये देशांतर्गत देखील स्पर्धा सुरु आहेत. टीम इंडियाचे अनेक यूवा खेळाडू हे सध्या देशांतर्गत सामने खेळत आहेत. आयपीएल ऑक्शन सुरु होणार आहे त्याआधीच आता चेन्नई सुपर किंग्जचे नशीब उजळलेले पाहायला मिळाले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीचे सामने सुरु आहेत यामध्ये अनेक आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी कमाल केली आहे. यामध्ये उर्विल पटेल याने धुमाकुळ घातला आणि सध्या त्याच्या बॅटिंगची चर्चा देशात होत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या या तरुण फलंदाजाने आयपीएलमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे. तो तोच फलंदाज आहे ज्याने क्रिस गेलचा सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडला. पुन्हा एकदा, या फलंदाजाने फक्त 31 चेंडूत शतक ठोकून धुमाकूळ घातला. हैदराबादच्या जिमखाना मैदानावर हे धमाकेदार शतक दिसले, ज्यामुळे सर्व्हिसेस संघाचे गोलंदाज थक्क झाले. या डावात 10 उत्तुंग षटकारही होते. टी-20 स्वरूपात भारतीय फलंदाजाने केलेले हे तिसरे सर्वात जलद शतक आहे.
आपण गुजरातचा कर्णधार उर्विल पटेलबद्दल बोलत आहोत, ज्याने ३१ चेंडूत १२ चौकार आणि १० षटकारांसह शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना सर्व्हिसेसने नऊ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, गुजरातचे सलामीवीर उर्विल आणि आर्या देसाई यांनी सर्व्हिसेसच्या आक्रमणाचा नाश केला. त्यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी केली आणि सामना एकतर्फी ठरला. उर्विलने ३७ चेंडूत ११९ धावांची धमाकेदार खेळी केली, तर आर्या देसाई ६० धावांवर बाद झाला.
Urvil Patel’s blistering 119* off 37 balls yesterday score the second-fastest T20 💯 by an Indian He reached the milestone in just 31 balls 🤯#IndianCricket pic.twitter.com/nmx0JBkN0l — Cricbuzz (@cricbuzz) November 27, 2025
उर्विल पटेलने युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचा विक्रमही मोडला आहे. गेलने ३० चेंडूत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता आणि तो अनेक दिवस यादीत अव्वल स्थानावर राहिला. पण २०२४ मध्ये उर्विलने वादळी खेळी करत २८ चेंडूत शतक ठोकले. त्या सामन्यात उर्विलने ३२२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि १२ षटकार मारले. उर्विलने ३५ चेंडूत ११२ धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यातील सामन्यात साहिल चौहानने २७ चेंडूत शतक ठोकून त्याचा विक्रम मोडला.
उर्विल आयपीएल २०२६ मध्ये दिसू शकतो. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. सीएसकेने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत परंतु उर्विलला सोडलेले नाही. जर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर तो पुढील हंगामात दिसू शकतो.