फोटो सौजन्य - X
T20 Mumbai League 2025 : आयपीएल 2025 चा हा सीजन आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर भारताचे काही खेळाडू हे इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघाची घोषणा केली आहे. आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई t20 लीग देखील पुढे ढकलण्यात आली होती, आता मुंबई t20 लीग चे वेळापत्रक समोर आले आहे आणि या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी टी-२० मुंबई लीग २०२५ चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. ही हाय-व्होल्टेज स्पर्धा आता ४ जून ते १२ जून दरम्यान खेळवली जाईल. हे सामने मुंबईतील दोन मोठ्या स्टेडियम, वानखेडे आणि डीवाय पाटील येथे होतील. आयपीएल २०२५ ची प्रगती आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन लीगचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या रोमांचक स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जातील. लीग टप्प्यात दररोज चार सामने होतील; दोन सामने वानखेडे स्टेडियमवर दुपारी २:३० आणि संध्याकाळी ७:३० वाजता खेळवले जातील, तर सामने डीवाय पाटील स्टेडियमवर सकाळी १०:३० आणि संध्याकाळी ५:३० वाजता खेळवले जातील.
Mumbai T20 League full schedule pic.twitter.com/kQjX744QWw
— sudharshan sridharan (@sudharshansrid1) May 20, 2025
या स्पर्धेची सुरुवात ४ जून रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर शिवम दुबेच्या एआरसीएस अंधेरी आणि श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्स यांच्यातील सामन्याने होईल. यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टचा सामना ईगल ठाणे स्ट्रायकर्सशी होईल. प्रत्येक संघ लीग टप्प्यात ५ सामने खेळेल. १० जून रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी अव्वल ४ संघ पात्र ठरतील. १२ जून रोजी येथे अंतिम सामनाही खेळवला जाईल.
CSK vs RR : आयुष म्हात्रे – डेवॉल्ड ब्रेव्हिसचा धुव्वाधार खेळी, CSK चे RR समोर 188 धावांचे लक्ष्य
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी प्रत्येकी एक राखीव दिवस (११ आणि १३ जून) ठेवण्यात आला आहे. सहा वर्षांनंतर परतणाऱ्या टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामामुळे मुंबईतील स्थानिक क्रिकेटपटूंना एक मोठे व्यासपीठ मिळणार आहे. एमसीएचे सचिव अभय हडप म्हणाले, “राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आणि आयपीएलशी टक्कर टाळण्यासाठी लीगचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आम्हाला विश्वास आहे की या हंगामात मुंबईला नवीन स्टार मिळतील.”