टीम इंडियाने सोडले तब्बल ११ कॅच, फील्डिंगचे तीनतेरा
टीम इंडियाने सातत्यपूर्ण कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. पण संपूर्ण स्पर्धेत संघाच्या क्षेत्ररक्षणाने सर्वात जास्त निराशा केली. भारतीय संघाने ११ कॅच सोडले आहेत. अंतिम सामन्यातही भारतीय संघाने कॅच सोडण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
Rachin dropped twice by Shami and Iyer
Mitchell dropped twice by Rohit and Gill Can argue they were not the easiest catches but we have not been at our best holding on to these catches.#INDvsNZ pic.twitter.com/ppYubhAN7t — Vaibhav (@UTD_INEOS_ERA) March 9, 2025
रविवार ९ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाकडून क्षेत्ररक्षणात सुधारणा होण्याची अपेक्षा होती. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच भारतीय संघाची फिल्डींग निराशा करणारी होती. अंतिम सामन्यातही ४ कॅच सोडले आहेत.
रोहित-गिल आणि अय्यर
अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्माने सातव्या षटकात रचिन रवींद्रचा झेल सोडून मोहम्मद शमीने त्याची सुरुवात केली. पुढच्याच षटकात रचिनला आणखी एक जीवनदान मिळाले आणि यावेळी चूक संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या श्रेयस अय्यरने केली. त्याने ८ व्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर रचिनचा झेल सोडला. यानंतर रचिनने काही मोठे फटके मारले पण कुलदीपने त्याचा डाव संपवला.
त्यानंतर ३५ व्या आणि ३६ व्या षटकातही टीम इंडियाने झेल सोडले. अक्षर पटेलच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माने डॅरिल मिशेलचा एक कठीण झेल सोडला. त्याने एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. मिशेल त्यावेळी ३८ धावांवर होता आणि ६३ धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात, शुभमन गिलने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर सीमारेषेजवळ ग्लेन फिलिप्सला जीवदान मिळालं. मात्र, फिलिप्स २ षटकांतच बाद झाला.
टीम इंडिया २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक झेल सोडणारा संघ बनला. या स्पर्धेत टीम इंडियाने एकूण ११ झेल सोडले. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने विरोधी फलंदाजांना जीवदान दिले आणि यामध्येही ४ सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी किमान २ वेळा झेल सोडण्याची चूक केली. अंतिम सामन्यात, भारतीय संघाने केवळ ४ झेल सोडले नाहीत तर रवींद्र जडेजाच्या थ्रोवर कुलदीप यादवने स्टंपजवळ येऊन चेंडू पकडण्याऐवजी काही अंतरावर उभे राहून चेंडू पाहात राहिला. तेव्हा रनआउटची संधीही गमावली. या जीवदानांचा फायदा घेत न्यूझीलंडने २५१ धावा केल्या.