फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निकाल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नुकताच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा पाचवा सामना संपला आहे. यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाला या मालिकेमध्ये १-३ अशी गमवावी लागली आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जाण्याच्या आशा देखील संपुष्ठात आल्या आहेत. भारताच्या संघाने हा सामना ६ विकेट्सने गमावला आहे. भारताच्या संघाची या मालिकेमध्ये खराब फलंदाजीमुळे पराभवाचा सामोरे जावे लागले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. भारताचे अनुभवी फलंदाज त्याचबरोबर भारताचे युवा खेळाडू सुद्धा संघासाठी मोठी कामगिरी करू शकले नाही.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात भारताच्या संघाने दमदार सुरुवात करून मालिकेचा दमदार शुभारंभ केला होता. त्यानंतर भारताच्या संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी साधली आणि टीम इंडियाला कांगारूंनी एकही संधी कमबॅकची दिली नाही. मालिकेचा तिसरा सामना अनिर्णयीत राहिला आणि त्यामुळे दोन्ही संघाला एकही गुण मिळाला नाही. चौथ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने सुरुवातीपासूनच दबदबा दाखवला आणि सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती.
पाचव्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग नव्हता त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे कर्णधार पद देण्यात आले होते. पण जसप्रीत बुमराहला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे विराट कोहलीने कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर भारताच्या संघाने केलेल्या खराब फलंदाजीमुळे पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने १८५ धावांवर रोखले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरले. पण टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करू शकले नाही. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारताच्या संघाला १५७ धावांवर रोखले त्यामुळे कांगारूंसमोर मोठी धावसंख्या टीम इंडिया उभी करू शकला नाही. टीम ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १६२ धावांचे लक्ष्य होते. ते लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गमावून सहज पूर्ण केले.
5TH Test. Australia Won by 6 Wicket(s) https://t.co/cDVkwfEkKm #AUSvIND
— BCCI (@BCCI) January 5, 2025
सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. भारताचा पहिल्या डावात १८५ धावा झाल्या. भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १८१ धावांत गुंडाळले. दुस-या डावात भारताने चार धावांची आघाडी घेतली होती, पण अवघ्या १५७ धावांत गुंडाळल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियासमोर साधे लक्ष्य ठेवता आले. भारताच्या दुसऱ्या डावात पंतने ६१ धावा केल्या, पण इतर कोणत्याही फलंदाजाला जम बसवता आला नाही. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आणि दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून १४१ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडून मजबूत भागीदारीची अपेक्षा होती जी पूर्ण होऊ शकली नाही. जडेजाला बाद करून कमिन्सने तिसऱ्या दिवशी भारताला पहिला धक्का दिला. जडेजा केवळ १३ धावा करू शकला. कमिन्सने सुंदरचा डाव १२ धावांवर संपुष्टात आणला. येथून भारताला मजबूत धावसंख्या गाठता येणार नाही हे निश्चित झाले होते. मोहम्मद सिराज चार धावा करून बोलंडचा बळी ठरला. स्कॉट बोलंडने कर्णधार बुमराहला गोलंदाजी देत भारतीय डाव संपवला.