Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक महिन्यात दोन विश्वचषक टीम इंडियाने केले नावावर! भारतीय महिला संघाने आणखी एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजवला डंका

T-२० ब्लाइंड महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला सात विकेट्सने पराभूत केले. हा पहिला ब्लाइंड महिला क्रिकेट विश्वचषक होता यावेळी टीम इंडियाच्या कर्णधाराने तिच्या भावना व्यक्त केल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 24, 2025 | 09:16 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

रविवारी केपी सारा ओव्हल मैदानावर झालेल्या टी-२० ब्लाइंड महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला सात विकेट्सने हरवून विजय मिळवला. हा पहिला ब्लाइंड महिला क्रिकेट विश्वचषक आहे. टी-२० ब्लाइंड महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार दीपिका टीसी म्हणाली की, हा एक मोठा विजय आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे. कर्णधार म्हणाली की, स्पर्धेदरम्यान काही संघ त्यांच्याविरुद्ध खेळण्यास घाबरत होते. त्याच वेळी, तिने संघावर विश्वास व्यक्त केला आणि पुरुषांविरुद्ध खेळण्याची इच्छाही व्यक्त केली.

एकतर्फी अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत केल्यानंतर, भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची कर्णधार दीपिका टीसीने माध्यमांशी बोलताना तिच्या भावना व्यक्त केल्या. कर्णधार म्हणाली, “आम्हाला खूप अभिमान आहे आणि हा एक मोठा विजय आहे. आमच्या संपूर्ण संघाने हे विजेतेपद जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. आमचा संघ खूप मजबूत आहे आणि इतर संघ आमच्याशी खेळण्यास घाबरत आहेत. आम्ही पुरुष संघासोबतही खेळण्यास तयार आहोत.”

Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाने साखरपुड्याच्या आणि मेहंदीच्या सर्व आठवणी टाकल्या पुसून, उचलले धक्कादायक पाऊल

भारताने प्रथम गोलंदाजी करताना नेपाळला पाच बाद ११४ धावांवर रोखले आणि त्यानंतर फक्त १२ षटकांत तीन बाद ११७ धावा करून विजेतेपद पटकावले. भारताचा दबदबा इतका होता की नेपाळला त्यांच्या डावात फक्त एकच चौकार मारता आला. फुला सरीनने नाबाद ४४ धावा काढत भारताचा सर्वाधिक धावा काढल्या. भारताने यापूर्वी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले होते, तर शनिवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत नेपाळने पाकिस्तानला हरवले होते. सह-यजमान श्रीलंकेला प्राथमिक टप्प्यातील पाच सामन्यांमध्ये (अमेरिकेविरुद्ध) फक्त एकच सामना जिंकता आला.

Tears of joy and pride as India’s blind women’s team clinches the T20 Blind World Cup 2025! A powerful moment of courage, resilience, and unbeatable spirit.#HistoricWin #IndiaChampion #BlindWomenWorldCup #CricketForAll@blind_cricket pic.twitter.com/iWVxEwSm9Q — Doordarshan Sports (@ddsportschannel) November 23, 2025

यापूर्वी, भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने पराभव केला होता. भारताने गट टप्प्यातही पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला होता. ब्लाइंड टी20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत एकूण सहा संघ सहभागी झाले होते: भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि नेपाळ. ही स्पर्धा 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाली, पहिले काही सामने दिल्ली आणि नंतर बेंगळुरूमध्ये खेळले गेले. त्यानंतर श्रीलंकेने नॉकआउट सामने आयोजित केले.

Web Title: Team india won two world cups in a month indian blind women team once again made waves at the international level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम
1

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी
2

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
3

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Rahul Dravid Birthday : जेव्हा जग द्रविडसमोर नतमस्तक झाले…आजही त्या पाच विक्रमांची नोंद रेकाॅर्डबुकमध्ये!
4

Rahul Dravid Birthday : जेव्हा जग द्रविडसमोर नतमस्तक झाले…आजही त्या पाच विक्रमांची नोंद रेकाॅर्डबुकमध्ये!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.