MI vs GT: Let's go..! Hardik Pandya and Sai Kishore's eye-to-eye
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करत या हंगामातील पहिला विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग दूसरा सामना गमवावा लगाला. आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम जसजसा पुढे जात आहे, तसतशी रंगत वाढू लागली आहे. मैदानावर अनेकदा दोन खेळाडूमध्ये चकमक झाल्याचे बघायाल मिळते. ही चकमक कधी दोघांमध्ये जोरदार वादावादीत रूपांतरित होते तर कधी फक्त नजरेला नजर भिडवली जाते. असेच काहीसे चित्र गुजरात आणि मुंबई यांच्यामधील सामन्यात देखील पहायला मिळाले. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि जीटीचा स्टार गोलंदाज साई किशोर यांच्यात नजरा नजर झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा : IPL 2025 : IPL 2025 मध्ये Rohit Sharma चा फ्लॉप शो सुरूच : GT विरुद्ध सिराजने उडवली दांडी..
मुंबई इंडियन्सच्या डावात हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात चकमक पाहयला मिळाली. दोघेही जवळपास 10 सेकंद एकमेकांकडे बघत राहिले. त्यानंतर पंड्याने किशोरला निघून जाण्याचा सल्ला दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
THIS IS IPL, THIS IS PEAK CINEMA. 🥶
– Hardik Pandya and Sai Kishore’s face off during the Match.
— Tanuj (@ImTanujSingh) March 29, 2025
सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या डावात हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात तणाव दिसून आला. मात्र, सामना संपल्यानंतर पंड्या आणि किशोर एकमेकांना मिठी मारताना देखील दिसून आले. हार्दिक पांड्यासोबतच्या लढतीवर साई किशोरने सांगितले की, ‘तो माझा चांगला मित्र असून मैदानावर असेच वातावरण असायला हवे. मैदानावर कोणीही प्रतिस्पर्धी असू शकतो, पण आम्ही ते वैयक्तिकरित्या ओढून घेत नाही. आम्ही चांगले स्पर्धक आहोत आणि मला वाटते की खेळ असेच असायला हवेत.’
हेही वाचा : MI vs GT : जसप्रीत बुमराह विना मुंबई इंडियन्सचा दुसरा पराभव, गुजरात टायटन्सने संघाला 36 धावांनी केलं पराभूत
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईला धूळ चारली. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय साजरा केला तर मुंबईला मात्र सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावा केल्या. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे 36 धावांनी मुंबईला पराभव पत्करावा लागला.