फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Gujarat Titans beat Mumbai Indians by 30 runs : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला गुजरात टायटन्सने36 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियनची खराब फलंदाजी, गोलंदाजी त्याचबरोबर फिल्डिंग अत्यंत निराशाजनक होती. त्यामुळे संघाला या सीझनमधील दुसऱ्या सामन्यात दोन पराभव पत्करावे लागले. माझ्या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएल २०२५ मधील पहिला विजय नावावर केला आहे.
गुजरात टायटनच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन यांनी पुन्हा एकदा अर्धशतक ठोकले आहे. हे आयपीएल २०२५ मधील त्याचे दुसरे अर्धशतक आहे. साई सुदर्शनने ४१ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या त्यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार ठोकले. शुभमन गिलने संघाला चांगली सुरुवात करून दिली त्याने २७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. तर जोस बटलरने २४ चेंबर मध्ये ३९ धावा केल्या त्यामध्ये त्याने एक षटकार आणि पाच चौकार मारले. शेरफन रुदरफोर्ड याने संघासाठी १८ महत्त्वाच्या धावा केला त्यामध्ये त्याने दोन षटकार मारले.
Match 9. Gujarat Titans Won by 36 Run(s) https://t.co/lDF4SwnuVR #GTvMI #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झाले तर ट्रेंट बोल्टने साई सुदर्शनला बाद केले आणि संघासाठी एक महत्वाचा विकेट मिळवला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने शुभमन गिल, शाहरुख खान आणि राहुल तेवतिया या तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि संघासाठी महत्त्वाचे तीन विकेट्स घेतले. दीपक चाहर शेरफन रुदरफोर्ड याला बाहेरचा रस्ता दाखवला. तर रशीद खानला सत्यनारायण राजू याने बाद केले. मुजीब रहमान याने गुजरात टायटन्सचा विकेटकीपर जॉस पटलरला आउट केले.
मुंबई इंडियन्सच्या बोलायचे झाले तर संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी सुरू केली. रोहित शर्मा ८ धावा करून बाद झाला तर रियन रिकलटन याने सुद्धा फक्त सहा धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माने संघासाठी ३६ चेंडूंमध्ये ३९धावा गेल्या तर २८ धावा केल्या पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने चांगली गोलंदाजी केली पण तो फलंदाजीमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही. हार्दिकने १७ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या.