RR vs RCB IPL 2024 Eliminator : आज आयपीएलमधील महत्त्वाचा एलिमिनेटर सामना बंगळुरू विरुद्ध राजस्थान यांच्यात रंगणार आहे. तत्पूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विराटला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने आरसीबीच्या मॅनेजमेंटकडून गुजरात मैदानावरील त्यांचे सरावाचे सत्र रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.
RCB कडून एकमेव सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय
IPL 2024 मधील त्यांच्या सर्वात महत्वाच्या सामन्याच्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने अहमदाबादमधील गुजरात कॉलेज मैदानावरील त्यांचे एकमेव सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. संघाने रद्द करण्याचे कोणतेही कारण दिलेले नसले तरी, बंगाली दैनिक आनंदबाजार पत्रिकामधील एका अहवालात गुजरात पोलिस अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे की, ते विराट कोहलीच्या सुरक्षेच्या धोक्याशी संबंधित असल्याने मॅनेजमेंटने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
ISIS चार संशयित दहशतवाद्यांना अटक
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ISIS शी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर दोन दिवसांनी हा अहवाल आला आहे. संशयितांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आणि त्याच दिवशी तीन आयपीएल संघ आयपीएल 2024 प्लेऑफसाठी शहरात आले होते त्याच दिवशी अहमदाबाद विमानतळावर उपस्थित राहण्याच्या त्यांच्या हेतूंबद्दल चौकशी करण्यात आली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरसीबीने सराव सत्र रद्द केले आहे.